Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल, मात्र मध्य रेल्वेने एक वेगळा विक्रम केला आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी मिळून फक्त भंगार विक्रीतून तब्बल २०२ कोटी रुपये कमावले आहेत. मध्य रेल्वेने (Central Railway) भंगार विक्रीच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, कोट्यवधी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, भंगार विक्रीतून २०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची मध्य रेल्वेची (Central Railway) ही आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी ठरली आहे. या कामगिरीत भुसावळ विभागाने (Bhusawal Division) ३३ कोटींपेक्षा अधिक भंगार विक्री करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विभागनिहाय कामगिरीत भुसावळ विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून, एकूण भंगार विक्रीत त्याचा मोठा वाटा आहे.
Nashik : सप्तशृंगी गडावरील जंगल परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या ...
भंगार विक्रीतून तब्बल २०२ कोटी ५५ लाख
मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून मोठी आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल २०२ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. विशेष म्हणजे, २०० कोटींचा टप्पा गाठण्याची ही मध्य रेल्वेची आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी ठरली आहे. या कामगिरीत भुसावळ विभागाचाही मोठा वाटा आहे. भुसावळ विभागाने ३३ कोटी १९ लाख रुपयांची भंगार विक्री केली असून, विभागनिहाय कामगिरीत भुसावळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई विभागाने ३६ कोटी ७८ लाख रुपयांची विक्री करत पहिला क्रमांक पटकावला आहे. पुणे विभाग २७.२२ कोटी, नागपूर विभाग २६.१२ कोटी आणि सोलापूर विभाग १०.८५ कोटी रुपयांच्या विक्रीसह पुढे आहेत. उत्पादन युनिट्स व कार्यशाळांनी मिळून ६८.३९ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका विद्यार्थिनीसोबत एका तरुणाने गैरकृत्य केल्याचं समोर आलं आहे. १७ वर्षीय ...
जुन्या साहित्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन
मध्य रेल्वेच्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर साहित्य विक्री करण्यात आली आहे. आतापर्यंत १७,७५५ मेट्रिक टन रेल्वे रूळ भंगार, १,२१,३८१ स्लीपर्स, ११,६५८ मेट्रिक टन लोहयुक्त भंगार आणि १,३७० मेट्रिक टन अ-लोहयुक्त भंगार विक्री करण्यात आले आहे. याशिवाय ११ लोकोमोटिव्ह, ३३ डबे आणि ३३ वॅगन्सचीही विक्री करण्यात आली आहे. भंगाराची वेळेत विल्हेवाट लावल्यामुळे रेल्वेच्या विविध परिसरातील जागा मोकळी होऊन तिचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करता येणार आहे. तसेच जुन्या साहित्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन केल्याने पर्यावरणीय शाश्वततेलाही चालना मिळत आहे.
Nandurbar : नंदुरबारच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना अक्कलकुवा तालुक्यात समोर आली आहे. गावात ...
मध्य रेल्वेच्या धोरणाला बळ
मध्य रेल्वेने सर्व विभाग आणि डेपोंमध्ये ‘झीरो स्क्रॅप स्टेट्स’ अर्थात भंगारमुक्त स्थिती साध्य करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत साचलेल्या भंगाराची ओळख पटवून त्याचे वर्गीकरण, नोंदणी आणि वेळेत विल्हेवाट यावर भर दिला जात आहे. भुसावळ विभागाची ३३.१९ कोटी रुपयांची भंगार विक्री ही या मोहिमेतील महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. भंगाराचे रूपांतर महसूल मिळवून देणाऱ्या मालमत्तेत करून रेल्वेच्या आर्थिक संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या मध्य रेल्वेच्या धोरणाला या कामगिरीमुळे बळ मिळाले आहे.