Jalgaon : अरे देवा ! चोरट्याने जामनेर आगाराची नवीन बसच पळवली, बस पंक्चर होताच...

Jalgaon : पैसे आणि दागिने चोर पळवतो अशी आपली समजूत असेल तर थांबा ! कारण जळगाव जिल्ह्यात चक्क चोरट्याने बसच पळवली आहे. जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगाराची नवी कोरी ‘जिजाऊ’ बस अज्ञात इसमाने मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरु आहे. (Jalgaon Crime News)



नेमकं काय घडलं ?


जामनेर आगाराची (Jamner Depot) एमएच १९, एनई ४२१४ क्रमांकाची ही बस रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता आगारातून गायब झाली. सोमवारी सकाळी ही बस शहापूर (Shahapur) गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर दिसली. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले. याबाबत गावात चर्चा सुरु झाली. शहापूर गावात जामनेर आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत. फरशी पुलावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या बस बाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसची पाहणी केल्यानंतर ही बस जामनेर आगाराची असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना घटनेची माहिती दिली. (Jalgaon Crime News)



जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने बस आगारातून बाहेर काढली. नवी कोरी बस घेऊन संशयिताने जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने प्रवास केला. मात्र, खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ बसचे पुढील चाक पंक्चर झाले. त्यानंतर बस पुढे नेता न आल्याने संशयिताने बस तेथेच सोडून दिली आणि घटनास्थळावरून पलायन केले. पळवून नेलेली नवी कोरी ‘जिजाऊ’ बस जामनेर आगारातून जळगाव-नेरी-जळगाव या मार्गावर नियमित धावत असते. प्रवाशांच्या सेवेसाठी वापरली जाणारी बस अशा प्रकारे पळवून नेण्यात आल्याने एसटी प्रशासनातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात (Jamner Police Station) अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. (Jalgaon Crime News)



आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


मात्र जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस अशाप्रकारे चोरी झालायने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बस आगारातून बाहेर जात असताना संबंधित व्यक्तीची कुणालाही चाहूल कशी लागली नाही, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत जामनेर पोलीसांकडून (Jamner Police )आधी तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि