Nashik Crime : ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार करत हजारो रुपये उकळले ! नाशिकमध्ये विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य

Nashik Crime : नाशिकमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका विद्यार्थिनीसोबत एका तरुणाने गैरकृत्य केल्याचं समोर आलं आहे. १७ वर्षीय विद्यार्थिनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून, तिचे अश्लिल फोटो काढून ब्लॅकमेल (Blackmail) करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयिताने पीडितेला अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्याकडून ३० ते ४० हजार रुपयेही उकळले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मूळ रहिवासी असलेली १७ वर्षीय मुलगी ही नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून राहत होती. याठीकाणी राहून ती सीईटी क्रॅश कोर्सचे क्लास करत होती. दरम्यान, सोशल मीडिया आणि मोबाईल संभाषणातून तिची ओळख संशयित युवराज रायते याच्याशी झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने तिच्याशी जवळीक साधली आणि तिला फिरण्यासाठी कॉलेज रोड, त्र्यंबक रोड आणि सातपूर परिसरात नेले. याठिकाणी त्याची नियत बिघडली. (Nashik Crime News)



ब्लॅकमेलिंग करत लैंगिक अत्याचार


संशयिताने पीडित मुलीचे अश्लिल फोटो काढून, ‘हे फोटो आई-वडिलांना दाखवीन व इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन’ अशी धमकी दिली. यानंतर सीटी सेंटर मॉल (City Centar Mall) रस्त्यावरील सातपूरकडे जाणाऱ्या एका लॉजवर (Lodge) नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतरही संशयिताचा त्रास थांबला नाही. त्याने पीडितेकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास फोटो इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर व्हायरल करण्याची, तिचे शिक्षण थांबवण्याची व लग्न होऊ न देण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने संशयिताला आतापर्यंत टप्प्याटप्प्याने ३० ते ४० हजार रुपये दिले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे. (Nashik Crime News)



पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल


दरम्यान, सततच्या ब्लॅकमेलिंग आणि त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम, आयटी अ‍ॅक्ट तसेच पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहाय्यक निरीक्षक तेजश्री आंबेकर (Tejashree Ambekar) तपास करत असून संशयितास ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे