Nashik : सप्तशृंगी गडावर अज्ञात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Nashik : सप्तशृंगी गडावरील जंगल परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने या युवकाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ संदीप शशिकांत बेनके यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ कळवण पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. (Nashik Crime News)



मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जगन काळू सूर्यवंशी यांच्या घराजवळील शेताच्या पश्चिम बाजूला असलेल्या जंगलात एका झाडाला युवकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हा युवक अंदाजे ३० ते ३५ वर्षांचा असल्याची माहिती आहे. मृत युवकाच्या अंगावर जांभळ्या रंगाचे जर्किंग आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे. विशेष म्हणजे, त्याच्या उजव्या हातावर ‘छत्रपती’ असे नाव गोंदलेले आढळून आले आहे. या वर्णनाच्या आधारे पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Nashik Crime News)



कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद


या घटनेप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात (Kalwan Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या आदेशाने तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सी. डी. बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मानसाराम बागुल, योगेश गवळी, संदीप बत्तीसे आणि राजेंद्र चौधरी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, युवकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून अधिक माहिती संकलित केली जात असून, या घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे