Pimpri-Chinchwad News : बापरे! खेळता खेळता अचानक कुत्र्यांच्या टोळक्याने घेरलं अन् चिमुकलीवर भीषण हल्ला

पिंपरी-चिंचवड : पुणे शहरातील म्हेत्रे वस्तीत मोकाट कुत्र्यांच्या टोळीने 4 वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घराजवळील मोकळ्या जागेत खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी काही मोकाट कुत्र्यांनी अचानक तिचा पाठलाग सुरू केला. मुलीने कुत्र्यांपासून वाचण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली आणि तिला चावा घेतला. त्यानंतर आणखी पाच कुत्रे या टोळीत सहभागी झाले.



सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुत्र्यांनी मुलीला चारही बाजूंनी घेरल्याचे दिसत आहे. हल्ल्यातून सुटण्यासाठी मुलगी प्रयत्न करत होती. तिचा आवाज ऐकून आणि हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावत मुलीची सुटका केली. (Pune News)


हल्ल्यात मुलीला गंभीर दुखापत झाली असून, तिला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


या घटनेनंतर म्हेत्रे वस्ती आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. (Dog Attack)


मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि लहान मुलांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने संवेदनशील भागांची पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.


Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि