Airport Job Fraud : विमानतळावरील नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; परीक्षा केंद्रावर पोहोचताच झाला प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावर आकर्षक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. भरती प्रक्रिया सरकारी नोकरीच्या धर्तीवर असल्याचे भासवून विद्यार्थ्यांकडून अर्ज आणि परीक्षा शुल्काच्या नावाखाली 500 ते 700 रुपये घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी केंद्रावर पोहोचले असता तिथे परीक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने गोंधळ उडाला. (Airport Job Fraud)



विमानतळावर विविध पदांवर नोकरी आणि महिन्याला 25 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार असल्याचे सांगण्यात आल्याने अनेक तरुणांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून परीक्षा शुल्कही जमा केले. त्यानंतर परीक्षेची तयारी करून ते निर्धारित परीक्षा केंद्रावर पोहोचले. (Job Scam)


रविवारी परीक्षा असल्याने राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा परिसरातील एका शाळेत दाखल झाले. संबंधित कंपनीकडून ऑनलाइन संगणकीय परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर संगणक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असतील, अशी त्यांची अपेक्षा होती.


मात्र, केंद्रावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांना एकही संगणक किंवा परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था दिसून आली नाही. परीक्षा नेमकी कशी होणार, याबाबत विद्यार्थ्यांनी तेथील व्यक्तींकडे विचारणा केली. मात्र, त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. (Maharashtra News)


दरम्यान, परीक्षा घेण्यासाठी आलेल्या कथित थर्ड पार्टी कंपनीच्या प्रतिनिधींनीही या परीक्षेबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. भरती अधिकृत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलीसही परीक्षा केंद्रावर दाखल झाले. आता या भरतीमागे नेमके कोण आहेत, विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेल्या शुल्काचे काय झाले आणि ही प्रक्रिया अधिकृत होती का, याचा तपास होणे आवश्यक आहे. (Job Fraud)

Comments
Add Comment

Kolhapur News : कोल्हापूरच्या विकासाला मोठी चालना; 1850 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांना मोठी चालना मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)

Pune Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ , संमतीपत्र न दिल्यास सक्तीने संपादन

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या

Baramati Plane Accident : बारामतीमध्ये सात महिन्यांत तिसरा विमान अपघात, प्रशिक्षण विमानानं धावपट्टी सोडली आणि झाला अपघात

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत यंदाच्या वर्षातला तिसरा विमान अपघात झाला आहे. ताजी घटना आज म्हणजेच रविवार ९

Pune Pub Raid : पहाटे ३ वाजेपर्यंत पार्टी रंगणाऱ्या पबवर पोलिसांची धाड! ८० ते १०० तरुण-तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पब आणि क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. विमानतळ

Sindhudurg : प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी AI वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा, जाणून घ्या कसा केला AI चा वापर ?

मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेविरोधात तरुणांचे आंदोलन, दिपकेकडून माफीची मागणी

बीड : नीट पेपरफुटी विरोधात आधी सोशल मीडियात कॅम्पेन नंतर जंतरमंतरवर सोनम वांगचुकच्या सहकार्याने आंदोलन