US Visa Bond Rule : ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! आता US Visa साठी भरावा लागू शकतो १७ लाखांचा बॉण्ड

नवी दिल्ली : अमेरिकेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने 'US Visa Bond Rule' या योजनेला पायलट प्रकल्पातून कायमस्वरूपी धोरणाचा दर्जा दिला आहे. नव्या नियमानुसार, निवडक देशांतील नागरिकांना Business (B-1) किंवा Tourist (B-2) व्हिसासाठी अर्ज करताना २० हजार डॉलर (सुमारे १७ लाख रुपये) पर्यंतचा सिक्युरिटी बॉण्ड भरावा लागू शकतो. (US Visa Bond Rule)


अमेरिकेच्या फेडरल रजिस्टरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, गरज भासल्यास व्हिसा अधिकारी संबंधित अर्जदाराकडून हा सिक्युरिटी बॉण्ड मागू शकतात.



भारतीयांसाठी दिलासादायक बातमी :


सध्या हा नियम ५० देशांतील नागरिकांवर लागू करण्यात आला असून, त्यामध्ये प्रामुख्याने आफ्रिकेतील देशांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांसाठी मात्र मोठा दिलासा म्हणजे या यादीत भारताचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारतीयांना B-1 आणि B-2 व्हिसासाठी अर्ज करताना कोणताही सिक्युरिटी बॉण्ड भरावा लागणार नाही. (US Visa Bond Rule)


मात्र, भारताचे शेजारी देश बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या यादीत समाविष्ट आहेत. तसेच भविष्यात परिस्थितीनुसार इतर देशांचाही या यादीत समावेश केला जाऊ शकतो, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. (US Visa Bond Rule)



नियमामागचा उद्देश काय?


अमेरिकन प्रशासनाच्या मते, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्युरिटी बॉण्डमुळे व्हिसा अटींचे पालन अधिक प्रभावीपणे होईल आणि प्रवासी निश्चित कालावधीनंतर आपल्या देशात परततील, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, इमिग्रेशन तज्ज्ञांच्या मते, एवढ्या मोठ्या रकमेचा बॉण्ड भरावा लागल्यास पर्यटन किंवा व्यावसायिक कारणांसाठी अमेरिकेला जाणाऱ्या सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. (US Visa Bond Rule)



२०२५ मध्ये झाली होती सुरुवात :


'US Visa Bond Rule'ची सुरुवात २०२५ मध्ये पायलट प्रकल्प म्हणून करण्यात आली होती. त्यावेळी ५ हजार, १० हजार आणि १५ हजार डॉलर असे तीन बॉण्ड पर्याय उपलब्ध होते. आता ५ हजार डॉलरचा पर्याय रद्द करण्यात आला असून कमाल बॉण्डची रक्कम २० हजार डॉलर करण्यात आली आहे. याशिवाय, ट्रम्प प्रशासनाने विविध व्हिसा श्रेणींसाठीचे शुल्क वाढवण्यासोबतच अर्जदारांच्या सोशल मीडिया खात्यांची पडताळणी अधिक कठोर केली आहे. भारतीय नागरिक सध्या या नव्या बॉण्ड नियमाच्या कक्षेबाहेर असले, तरी अमेरिकेच्या कठोर इमिग्रेशन धोरणामुळे भविष्यातील बदलांकडे लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे. (US Visa Bond Rule)

Comments
Add Comment

Javelin Missile : भारत अमेरिकेकडून ‘जॅव्हेलिन’ क्षेपणास्त्र खरेदी करणार, शत्रूचे रणगाडे क्षणात नष्ट करणार

नवी दिल्ली : भारत आपली सुरक्षा यंत्रणा सातत्याने आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी भारताकडून

Flood situation in Nepal : पूरग्रस्त नेपाळसाठी भारताची ‘एअर रिलीफ’; वायुसेनेने पोहोचवली 47.5 टन मदत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये हिमनदीचा मोठा भाग तुटल्याने आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या हानीचा सामना

Citizens from Maharashtra stranded in Nepal : सागात अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

सागा : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले

New Delhi : नवी दिल्लीत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्याला अटक

मोहम्मद साहिल व समिराकडून केले जप्त 8 भारतीय सिमकार्ड नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले