टीझरला मिळालेल्या प्रचंड आणि जबरदस्त प्रतिसादानंतर आता "मिर्झापूर द मूव्ही" हा चित्रपट(Movie) ११ ऑगस्ट रोजी आपल्या अधिकृत ट्रेलरच्या रिलीजची पूर्ण तयारी करत आहे. यानंतर हा बहुप्रतिक्षित (long awaited) चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये (Multiplex) प्रदर्शित होणार आहे.
मिर्झापूर द मूव्हीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता सातत्याने वाढत असून, आता निर्माते चित्रपटात आणखी एक धमाकेदार सरप्राइज जोडण्याच्या तयारीत आहेत. प्रकल्पाशी संबंधित एका जवळच्या सूत्रानुसार, वेगाने लोकप्रिय होत असलेला हरियाणवी रॅपर, गायक आणि गीतकार ढांडा न्योलीवाला या चित्रपटातील एका खास रॅप ट्रॅकमागे सहभागी झाला आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याचे प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्या ...
रफ-टफ आणि हाय-ऑक्टेन रॅप गाणे :
प्रकल्पाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बूम शाका लाका, रशियन बंडाना आणि नाईफ ब्राउज यांसारख्या सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ढांडा न्योलीवालाला मिर्झापूर: द मूव्हीसाठी एका दमदार रॅप ट्रॅकमध्ये सामील करण्यात आले आहे. हे गाणे चित्रपटाच्या रफ-टफ आणि हाय-ऑक्टेन जगाशी पूर्णपणे सुसंगत असेल आणि प्रेक्षकांना एक जबरदस्त म्युझिकल अनुभव देईल. आपल्या दमदार हरियाणवी गाण्यांमुळे आणि वेगळ्या शैलीमुळे ओळखला जाणारा ढांडा न्योलीवाला हा हरियाणातील न्योली गावाचा रहिवासी आहे. त्याने अत्यंत कमी कालावधीत इंडिपेंडंट म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वात आशादायी कलाकारांपैकी एक म्हणून स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. त्याच्या सहभागामुळे चित्रपटाच्या संगीताला नवा फ्लेवर मिळण्याबरोबरच मिर्झापूरच्या दमदार आणि हाय-एनर्जी विश्वाला तो आणखी प्रभावी बनवेल.
पेरू देशात पर्यटकांचे विमान शेतात कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात (Peru country) एक अत्यंत ...
चित्रपटातील स्टारकास्ट आणि Production Team :
मिर्झापूर द मूव्हीमध्ये अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस चौहान हे कलाकार या फ्रेंचायझीच्या नव्या अध्यायात एकत्र दिसणार आहेत. मिर्झापूर द मूव्हीची निर्मिती ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांनी सादर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाचे निर्माते आहेत, तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी सहनिर्माते आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत (Multiplex) प्रदर्शित होणार आहे.






