Mirzapur The Movie : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'चा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, आता चित्रपटाच्या मेगा प्रमोशनची तयारी सुरू झाली आहे. 11 ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम देशभरातील 7 ते 8 शहरांमध्ये विशेष प्रमोशनल दौरा करणार आहे. या रोड ट्रिपमध्ये प्रमुख कलाकार चाहत्यांशी थेट संवाद साधत चित्रपटाचा उत्साह आणखी वाढवणार आहेत. (Mirzapur The Movie)
सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रेलर लॉन्चनंतर निर्माते मोठ्या प्रमाणावर मल्टी-सिटी प्रमोशन मोहीम राबवणार आहेत. या दौऱ्यात पंकज त्रिपाठी (Panjak Tripati), अली फझल, दिव्येंदू शर्मा यांच्यासह चित्रपटातील प्रमुख कलाकार विविध शहरांना भेट देणार असून, थिएटर रिलीजपूर्वी 'मिर्झापूर: द मूव्ही'चा भौकाल देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Mirzapur Star Cast)
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार आणि अप्रतिम अभिनयाचा अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांचे नाव आजही चित्रपटसृष्टीत आदराने घेतले ...
टीझरमध्ये प्रेक्षकांना 'मिर्झापूर'च्या दमदार विश्वाची झलक पाहायला मिळाली आहे. अॅक्शन, इंटेन्स ड्रामा आणि थरारक कथानकाची परंपरा कायम ठेवत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नवा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळाले आहेत. (Trailer)
चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Ali Fazal)
'मिर्झापूर: द मूव्ही'ची प्रस्तुती Amazon MGM Studios आणि Excel Entertainment यांनी केली आहे. गुरमीत सिंग यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, कथा आणि पटकथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कासिम जगमागिया आणि विशाल रामचंद्रानी हे सहनिर्माते आहेत. (Bollywood News)
'मिर्झापूर: द मूव्ही' 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, हिंदीसोबतच तेलुगू भाषेतही हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. (Entertainment)





