मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याचे प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात कायदेशीर घडामोड समोर आली आहे. मुंबईच्या विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा न्यायालयाने शनिवारी (१ ऑगस्ट ) या गाजलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा जणांवर औपचारिकपणे आरोप निश्चित केले आहेत.
फ्रेंडशिप डे आला की सोशल मीडियावर शुभेच्छांच्या मेसेजेस चा वर्षाव होतो. मात्र, या डिजिटल जगात तुमचा असा कोणता मित्र आहे का, जो कठीण काळात तुमच्या ...
आरोपींनी स्वतःवर केलेले आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचे म्हटल्यानंतर, विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी हे आरोप निश्चित केले. आता या सर्व आरोपींना हत्येचे गुन्हे आणि कठोर अशा 'यूएपीए' कायद्यांतर्गत खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या अत्यंत बहुचर्चित आणि संवेदनशील प्रकरणात आता आरोप निश्चित झाल्यामुळे खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला आणि साक्षीदारांच्या जबाबांना गती मिळणार आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह अन्य आठ आरोपी आता न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार आहेत.
ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी आपल्या अफाट संघर्षमय प्रवासातून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. राष्ट्रकुल ...
दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या बहुमजली निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एका एसयूव्ही कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या कारचे मालक असल्याचे सांगणारे ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हे ५ मार्च २०२१ रोजी ठाण्याच्या खाडीत मृतावस्थेत आढळले होते. या दोन्ही घटनांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
पेरू देशात पर्यटकांचे विमान शेतात कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात (Peru country) एक अत्यंत ...
वाझेचा सहभाग
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोप केला आहे की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेच उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली होती. श्रीमंत व्यक्तींमध्ये दहशत निर्माण करून, एका उच्चपदस्थ राजकीय व्यक्तीने ठरवून दिलेले १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे मासिक उद्दिष्ट पूर्ण करणे हा यामागील मुख्य उद्देश होता. तसेच, स्वतःची 'सुपर कॉप' म्हणून गेलेली पत आणि प्रतिश प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी वाझेने हे कृत्य केले होते, असेही तपास यंत्रणेने स्पष्ट केले.
मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील प्रसिद्ध माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रस्ता खचल्याची ...
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट
एनआयएच्या आरोपानुसार, स्फोटकांच्या या प्रकरणात सर्व दोष आपल्यावर घ्यायला मनसुख हिरेन यांनी स्पष्ट नकार दिला होता. ते या कटाचा पर्दाफाश करू शकतात आणि ही साखळी तोडू शकतात, या भीतीपोटी हिरेन हे पोलिसांसाठी आणि या कटातील सूत्रधारांसाठी एक 'कमकुवत दुवा' ठरत होते. याच कारणातून सचिन वाझेने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मनसुख हिरेन यांचा काटा काढण्याचा म्हणजेच त्यांच्या हत्येचा कट रचला.






