Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजनात समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) शुक्रवारी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि त्यानंतर उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकींमध्ये संबंधित संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Simhastha Kumbh Mela 2027)
Nashik News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पॅरा-अॅथलेटिक्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. या सुवर्णयशात नाशिक ...
अभियानांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत चर्चा
सकाळी झालेल्या बैठकीत मराठा विद्या प्रसारक समाज (एमव्हीपी), क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, के. के. वाघ शिक्षण संस्था , गोखले एज्युकेशन सोसायटीमहात्मा गांधी विद्यामंदिर, डागा सेवा मंडळ, नाशिक एज्युकेशन सोसायटी, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सिंहस्थासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींची स्वयंसेवक म्हणून नोंदणी, प्रत्येक संस्थेत स्वयंसेवक समन्वयक नियुक्त करणे, एनएसएस, एनसीसी, स्काऊट-गाईड, विद्यार्थी विकास मंडळ यांचा सहभाग, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, डिजिटल स्वयंसेवा आणि जनजागृती अभियानांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच विविध स्पर्धा, कार्यशाळा आणि जनजागृती उपक्रम राबविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. (Simhastha Kumbh Mela 2027)
Nashik Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ...
उद्योग संघटनांशी कुंभमेळा प्राधिकरणाची चर्चा
त्यानंतर झालेल्या बैठकीत नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), नाशिक नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (एनईसी), नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन (निटा),महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, बिझनेस असोसिएशन, लघु उद्योग भारती, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) - नाशिक तसेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), नाशिक विभाग यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. सिंहस्थासाठी उद्योग क्षेत्राचा सीएसआर अंतर्गत सहभाग, कॉर्पोरेट व्हॉलंटिअर प्रोग्राम, तंत्रज्ञान आणि डिजिटल उपाययोजना, कौशल्याधारित स्वयंसेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, तसेच भाविकांसाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग क्षेत्राची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक उद्योग संघटनेने समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबतही बैठकीत सूचना करण्यात आल्या. (Simhastha Kumbh Mela 2027)
Earthquake in Nashik : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यात मागील आठवड्यापासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. काही धक्के दिंडोरीसोबतच पेठ, कळवण आणि ...
सिंहस्थ २०२७ संपूर्ण समाजाचे सामूहिक दायित्व
यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ २०२७ हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे सामूहिक दायित्व असल्याचे सांगितले. शैक्षणिक संस्थांमधून प्रशिक्षित स्वयंसेवकांची सक्षम फळी उभी राहू शकते, तर उद्योग क्षेत्र तंत्रज्ञान, नवकल्पना, कुशल मनुष्यबळ आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. सिंहस्थ २०२७ लोकसहभागाचे आदर्श मॉडेल ठरावे, यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.






