Nashik : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत नाफेडमार्फत (NAFED) आणि एनसीसीएफ मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीच्या किमान हमी खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली असून ही या हंगामातील सातवी वाढ आहे. ३० जुलै २०२६ पासून ग्रेड-ए दर्जाच्या कांद्यासाठी प्रतिक्विंटल २,३३५ रुपये इतका नवीन हमी दर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Onion Growing Farmers)
मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर (Trauma Care) रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय अविवाहित तरुणीने रुग्णालयातील स्वच्छतागृहात ...
अधिकृत आदेश जारी
याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या (Ministry of Food and Public Distribution) कॉस्टिंग सेलने अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यानुसार, ३० जुलैपासून ग्रेड-यूआरएस कांद्याची खरेदी बंद करण्यात येणार असून, केवळ ग्रेड-ए दर्जाचा कांदाच खरेदी केला जाणार आहे. (Onion Growing Farmers)
Shalarth ID Scam : राज्यातील बहुचर्चित राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या (Shalarth ID Scam) तपासाला आता अधिक वेग आला आहे. या ...
कांदा खरेदी हंगामातील सातवी दरवाढ
यंदाच्या कांदा खरेदी हंगामातील ही सातवी दरवाढ असून, सुरुवातीला प्रतिक्विंटल १३५० रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आली होती. तीन महिन्यात (९०) दिवसात १०८५ रुपयांची दरवाढ नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मिळाली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालया कडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहे. (Onion Growing Farmers)
राज्यातील बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला व्यापाऱ्यांकडून चांगले दर मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्रीस प्राधान्य देत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणात नाफेडकडे कांदा विकावा आणि केंद्रीय खरेदी संस्थांकडे आवक वाढावी, यासाठीच नाफेडने (NAFED) पुन्हा एकदा खरेदी दर वाढविल्याचे बोलले जात आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, पुढील काळात बाजारातील परिस्थितीनुसार खरेदी धोरणात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





