Nashik : सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावरील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजता भीषण अपघात झाल्यानंतर त्याच घटनास्थळापासून अवघ्या १० मीटर अंतरावर सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा दुचाकीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.(Sinnar Accident News)
या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे एकाच ठिकाणी काही तासांच्या अंतराने दोन अपघात झाल्याने या रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी अपघाताची कारणे शोधून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, जखमी व्यक्तीची ओळख व त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Sinnar Accident News)
Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजेच्या ...
एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर
दरम्यान, पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा कॅनलजवळ (Pimpalgaon Kadva Canal) आज पहाटे सुमारे ६ वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक वाहनाचा भीषण अपघात झाला होता. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक MH 20 BC 7264 असा आहे. दरम्यान, या भीषण अपघातात वाहनचालक अलीम आदम सहा (वय ३०, रा. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, तीन जण सुखरूप असल्याचे समजते.





