Nashik : भुसा भरलेल्या गादीपासून ते राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकापर्यंत ! नाशिकच्या सर्वेश कुशारेची प्रेरणादायी झेप

Nashik : नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव या छोट्याशा गावातून सुरू झालेला सर्वेश कुशारेचा प्रवास आज जगभर गाजत आहे. भुसा भरलेल्या गादीवर उंच उडीचा सराव करणाऱ्या सर्वेश कुशारेने (Sarvesh Kushare) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला ऐतिहासिक रौप्यपदक मिळवून देत नवा इतिहास रचला आहे. ग्लासगो (Glasgow) येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वेशने तब्बल २.२५ मीटर उंच झेप घेत भारताच्या खात्यात उंच उडीतील पहिलेच रौप्यपदक (Silver medal) जमा केले. त्यामुळे सर्वेशचे नाव भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.



संधीचं केलं सोनं


सर्वेशच्या या यशामागे त्याची जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी कारणीभूत आहे. नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सर्वेश हा माजी विद्यार्थी. सर्वेशचे वडील अनिल कुशारे हे शेतकरी. आपल्या मुलाने सिव्हिल इंजिनियर व्हावे, अशी त्यांची इच्छा. परंतु, सर्वेशला मात्र उंच उडी या क्रीडा प्रकाराने आकर्षित केले होते. नाशिक विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत उंच उडीत (High jump) सर्वेशने तृतीय क्रमांक मिळवल्यावर क्रीडा प्रशिक्षक रावसाहेब जाधव हे त्याच्या कामगिरीने प्रभावित झाले. त्यांनी २०१० पासून सर्वेशकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.



भुसा भरलेल्या गादीपासून, रौप्यपदकापर्यंत


गावात आवश्यक सुविधा नसल्याने मक्याचा भुसा, जुने कपडे आणि कापूस वापरून त्यांनी गावठी गादी तयार केली आणि त्याच गादीवर सर्वेशच्या यशाची पायाभरणी झाली. २०१६ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये त्याने आधुनिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक, आशियाई ॲथलेटिक्समधील रौप्यपदक, जागतिक स्पर्धेतील सहभाग, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता अशा अनेक टप्प्यांवर सर्वेशने सातत्याने भारताचा झेंडा उंचावला.



सर्वेश कुशारेची प्रेरणादायी झेप


मागील वर्षी टोकियो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत २.२८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत सहावे स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. यंदा भुवनेश्वर येथे राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत २.३१ मीटर उंच उडी मारत त्याने तेजस्वीन शंकरचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आणि भारताचा अव्वल उंचउडीपटू म्हणून स्वतःची ओळख अधिक भक्कम केली. इतकेच नाही, तर मोनॅको डायमंड लीगमध्ये (Monaco Diamond League) कांस्यपदक जिंकत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळवणारा पहिला भारतीय उंचउडीपटू आणि एकूण चौथा भारतीय खेळाडू ठरण्याचा मानही सर्वेशने पटकावला.


दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र तेथील वातावरणाचा परिणाम झाल्याचे प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी सांगितले. तरीही सर्वेशची पुढची नजर आता २.३५ मीटर उंचीचा नवा टप्पा गाठण्यावर आहे. भुसा भरलेल्या गादीवर सुरू झालेला सराव आणि आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा तिरंगा उंचावणारा सर्वेश कुशारेची ही कहाणी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक