Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ, रेल्वे, स्वयंसेवक आणि गर्दी व्यवस्थापन प्रत्येक स्तरावर नियोजन सुरू असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी दिली.
Nashik : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी ( दि.२६) ‘मन की बात’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलसंवर्धन उपक्रमांची दखल ...
शेखर सिंह नेमकं काय म्हणाले ?
कुंभमेळ्याच्या कामांची प्रगती समाधानकारक असून, मार्च २०२७ पर्यंत महत्त्वाची रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. पावसाळ्यामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्यावरही प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून आवश्यक दुरुस्ती आणि नियोजन केले जात आहे. कुंभमेळा हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून समाजाचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती आणि भावजागरणाचे कार्यक्रम राबवले जातआहेत. सोबतच कुंभमेळ्यासाठी तब्बल १५०० स्वयंसेवकांची नियुक्ती करणार असल्याची माहितीही शेखर सिंह यांनी दिली. (Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela )
गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे. रिंग रोड, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, जसे की १८ मीटरचे रस्ते २४ मीटर करण्याचे काम, विमानतळाची क्षमता तिप्पट करण्याची योजना, तीन नवीन रेल्वे स्थानके, नवीन बस स्थानक तसेच घाटांची संख्या वाढवण्याची कामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकीकडे विकासकामांना वेग, तर दुसरीकडे गर्दी व्यवस्थापन आणि जनसहभागावर भर अशा दुहेरी रणनीतीसह सिंहस्थ कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.