पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला. हाँगकाँग येथून हाँगकाँग एअर कार्गोचे पहिले समर्पित आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरील आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांच्या विस्ताराचा हा महत्त्वाचा टप्पा असून, आगामी काळात आणखी १३ नवीन आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवा सुरू होणार आहेत.
सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प https://prahaar.in/2026/08/17/this-years-ganeshotsav-set-to-gain-unesco-recognition-mahayuti-government-gears-up/ मुंबई : पनवेल येथील ...
हाँगकाँग एअर कार्गोतर्फे हाँगकाँग आणि नवी मुंबई दरम्यान आठवड्यातून तीन सेवा चालविण्यात येणार आहेत. यामुळे दर आठवड्याला सहा मालवाहतूक हवाई फेऱ्या होतील. या सेवेसाठी एअरबस ए३३०-२००एफ या मालवाहूविमानाचा वापर केला जाणार असून, त्यातून आयात-निर्यात मिळूनसुमारे ६० टन मालाची वाहतूक केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील विस्ताराला वेग देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अल्पावधीत दोन महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. १५ जुलै २०२६ रोजी एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबीला जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू झाली. त्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी इंडिगो कार्गोची शारजाहला जाणारी पहिली समर्पित मालवाहू सेवा सुरूकरण्यात आली. या सेवेद्वारे २० टन मालाची वाहतूक करण्यात आली. या घडामोडींमुळे प्रवासी तसेच मालवाहतूक क्षेत्रात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वेगवान प्रगती अधोरेखित झाली आहे.
नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. हा कचरा गोळा ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांचा विस्तार वेगाने होतअसून, आशिया, युरोप आणि पश्चिम आशियातील प्रमुख शहरांसाठी विविध आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केले असून त्यांना मंजुरीही मिळाली आहे. यामध्ये हाँगकाँग, चेंगडू, बँकॉक, तैपेई, क्वालालंपूर, सिंगापूर, अबुधाबी, दोहा, फ्रँकफर्ट, इस्तंबूल, दुबई, अॅमस्टरडॅम, बहरीन, पॅरिस आणि रियाध या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार, भारतातील पंधरा वर्षे आणि ...
ऑगस्टच्या अखेरीस मालवाहू विमानांच्या सेवांमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. आशिया, युरोपआणि पश्चिम आशियातील महत्त्वाच्या बाजारपेठांशी जोडणी मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्यात येणार आहे. या वाढत्या नेटवर्कमुळे निर्यातदार, आयातदार आणि उद्योगांना अधिक संधी उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्र आणि पश्चिम भारतासाठी धोरणात्मक लॉजिस्टिक्स व व्यापार प्रवेशद्वार म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूमिका अधिक भक्कम होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची टप्प्याटप्प्याने विकसित केली जाणारी आणि विस्तारक्षम मालवाहतूक पायाभूत सुविधा देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय, एक्स्प्रेस तसेच विशेष प्रकारच्या मालवाहतुकीसाठी सज्ज आहे. यामध्ये औषधे, नाशवंतवस्तू, मौल्यवानवस्तू, अवजड माल आणि धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश आहे. भविष्यात माल हाताळणी प्रक्रियेत स्वयंचलित तंत्रज्ञान आणि डिजिटल मालवाहतूक प्रणालींचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे.
एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के सवलत https://prahaar.in/2026/08/17/the-saga-of-chhatrapati-shivaji-maharajs-historic-feat-at-agra-will-be-conveyed-to-the-new-generation-protocol-minister-jaykumar-rawal/ मुंबई ...
पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र : राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण तसेच महाराष्ट्र शासनाच्या लॉजिस्टिक्स धोरण २०२४ शी सुसंगत पद्धतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तंत्रज्ञानाधारित आणि अखंडित मालवाहतूक व्यवस्था उभारली जात आहे. या विस्तारित नेटवर्कमुळे विमानतळाची जगातील प्रमुख व्यापार व लॉजिस्टिक्स केंद्रांशी जोडणी होणार असून, पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र म्हणून विमानतळाचे स्थान अधिक मजबूत होणार आहे.