कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि ५ वर कसारा दिशेकडे असलेल्या वॉटर कूलरच्या केबिनमध्ये नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शने आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Pune : पुण्यामधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. हाताला काम नाही, घरून मिळणारे पैसे अपुरे पडतात आणि दैनंदिन खर्च भागत ...
मिळालेल्या माहितीनुसार, फलाट क्रमांक ४ आणि ५ वरील वॉटर कूलरच्या केबिनमध्ये काही संशयास्पद इंजेक्शने आढळून आली. ही इंजेक्शने नेमकी कोणी आणि कशासाठी वापरली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या प्रकारामुळे स्थानक परिसरात नशेखोरांचा वावर किती आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर भर https://prahaar.in/2026/08/17/development-of-the-anandwadi-fishing-harbour-in-devgad-set-to-gain-momentum-directives-issued-for-planning-the-proposed-works-minister-nitesh-rane-reviews-the-project/ मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ...
कल्याण स्थानकात यापूर्वीही नशेखोरांकडून प्रवाशांना त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी फलाट क्रमांक १ वर एका नशेखोराने तरुणीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून गस्त वाढविण्यात आली होती. तसेच प्याऊची मोटार चोरीला जाण्याच्या घटनेनेही सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली होती.
नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. हा कचरा गोळा ...
कल्याण जंक्शन हे मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे स्थानक असून दररोज उत्तर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा येथे होते. अशा संवेदनशील ठिकाणी नशेची इंजेक्शने आढळणे गंभीर मानले जात आहे. स्थानकातील वॉटर कूलर केबिन, जिने आणि इतर निर्जन भागांमध्ये नियमित तपासणी व गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.