Nashik News : दिंडोरी, पेठ अन् सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik News : नाशिक जिल्हयातील दिंडोरी, पेठ अन् सुरगाणा तालुक्यात मंगळवारी पुन्हा भूकंपाचे धक्के सौम्य धक्के बसले आहे. दिंडोरी तालुक्यातील वारे आणि वनारे परिसर तसेच पेठ तालुक्यातील पवारपाडा, गावानपाडा आणि सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



तातडीने भूकंप मापक यंत्रणा बसवावी


तसेच पेठ तालुक्यातील पवारपाडा, गावानपाडा परिसरात ३.३० वाजेच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. याप्रकरणी दिंडोरी (Dindori Tehsil Office) आणि पेठ तहसील कार्यालयाकडून (Peth Tehsil Office) अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नसली तरी या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात तातडीने भूकंप मापक यंत्रणा (Earthquake Monitoring System) बसवावी अशी मागणी माजी आमदार महाले यांनी केली आहे.



आंबेवाडी डोंगराचा मोठा भाग खचला


सुरगाणा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असताना, दुसरीकडे अनेक शेतजमिनींमध्ये भेगा पडल्या असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने जमीन आणखी खचण्याची शक्यता बळावली आहे. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे डोंगराचा मोठा भाग खचून मोठे दगड, गोटे आणि मुरूम वेगाने खाली येत शेती खरवडून निघाली. आदिवासी भागातील शेती पूर्ववत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे.



नाशिकमध्ये भूगर्भीय हालचाली वाढल्या ?


मागील तीन दिवसांपासून सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यात भूगर्भात हालचाली होत आहेत. इगतपुरी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील डोंगराचा अंशतः भाग खचला असून डोंगरात चरीसारखा भाग तयार होऊन पाण्याचा प्रचंड ओहोळ वाहू लागला. या प्रवाहासोबत मोठे दगड, माती आणि मुरूम वेगाने खाली येऊन वनपट्टेधारक तसेच खासगी जमीनमालकांच्या शेतात पसरले. त्यामुळे शेती पूर्णपणे खरवडून निघाली आहे. भूकंपाचे धक्के बसलेल्या सुरगाणा परिसरातील घटना आणि इगतपुरीतील डोंगर खचण्याच्या घटनेचा थेट संबंध नसला, तरी दोन्ही ठिकाणी भूगर्भातील हालचालींचा समान धागा समोर येत आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही भाग मुसळधार पावसाच्या पट्ट्यात आहेत.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक