Tuesday, July 28, 2026

Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मंगळवारी (दि. २८) दुपारी ४ वाजता मोठी वाढ करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजल्यापासून धरणातून एकूण ६,९४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने (Water Resources Department) केले आहे.

६,९४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी गंगापूर धरणातून (Gangapur Dam) ४,९४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने त्यामध्ये १,९९९ क्युसेकने वाढ करण्यात आली असून, आता एकूण विसर्ग ६,९४६ क्युसेक इतका झाला आहे.

विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात ठेवलेले तात्पुरते साहित्य, जनावरे किंवा इतर वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने (Nashik Irrigation Division) केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >