ISSF World Cup : सोनम आणि हिमांशूला १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक

हाँगझोऊ : चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय रायफल नेमबाज सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले. आणि भारताच्या पदकांच्या यादीत आणखी एका यशाची भर घातली.(ISSF World Cup)



पात्रता फेरीत दोन्ही भारतीय संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. एका प्रसिद्धीपत्रकानुसार, सोनम उत्तम मस्कर (३१७.२) आणि हिमांशू ढिल्लन (३१७.४) यांनी एकत्रितपणे ६३४.६ गुणांची पात्रता धावसंख्या नोंदवली. त्याच वेळी, एलावेनिल वलारिवन (३१६.८) आणि पार्थ राकेश माने (३१७.४) यांच्या जोडीने ६३४.२ गुणांसह त्यांच्या पाठोपाठ पात्रता मिळवली. अंतिम फेरीत, सोनम आणि हिमांशू यांनी संयमित कामगिरी करत एकूण ४४१.२ गुण (प्रत्येकी २२०.६) मिळवले आणि चीन १ व चीन २ या संघांच्या मागे राहत कांस्यपदक निश्चित केले. एलावेनिल आणि पार्थ ३७८.८ गुणांसह (एलावेनिल: १९०.५, पार्थ: १८८.३) चौथ्या स्थानावर राहिले.



सोनम म्हणाली, "ही एक कठीण स्पर्धा होती आणि एकूणच अनुभव खूप चांगला होता. पदक जिंकणे नेहमीच महत्त्वाचे असते कारण त्यामुळे आम्हाला पुढील स्पर्धांसाठी आत्मविश्वास मिळतो. अनुभवाला सर्वात जास्त महत्त्व असते आणि या हंगामात नंतर होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी ही कामगिरी आम्हाला नक्कीच प्रेरणा देईल."आपल्या कारकिर्दीतील पहिल्या वरिष्ठ आयएसएसएफ विश्वचषक अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या हिमांशू ढिल्लनने सांगितले, "माझ्या पहिल्या वरिष्ठ विश्वचषक अंतिम फेरीत स्पर्धा करणे हा एक उत्तम अनुभव होता. माझा स्वतःवर विश्वास होता, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनावर विश्वास होता आणि माझ्या बलस्थानांवर मी अवलंबून राहिलो.



महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या २३ वर्षीय सोनम उत्तम मस्करसाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. सोनमने यापूर्वी २०२४ मध्ये कैरो येथील आयएसएसएफ विश्वचषक आणि नवी दिल्ली येथील आयएसएसएफ विश्वचषक फायनलमध्ये रौप्य पदके पटकावली होती. तसेच ग्रनाडा येथील आयएसएसएफ विश्वचषकात पाचवे स्थान मिळवले होते. या कामगिरीमुळे भारताच्या अव्वल रायफल नेमबाजांपैकी एक म्हणून तिची प्रतिष्ठा अधिक दृढ झाली आहे.हरियाणातील जिंद येथील २० वर्षीय हिमांशू ढिल्लनसाठी हे कांस्य पदक म्हणजे वरिष्ठ गटातील ISSF विश्वचषकात मिळवलेले त्याचे पहिलेच पदक (पोडियम फिनिश) ठरले आहे. हिमांशूने यापूर्वी नवी दिल्ली येथे २०२५ मध्ये झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषकात १० मीटर एअर रायफल (पुरुष ज्युनियर) प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यानंतर आशियाई नेमबाजी स्पर्धेतही आणखी एक सुवर्णपदक पटकावले होते.(ISSF World Cup)

Comments
Add Comment

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान