Nashik Crime News : CEO ची बनावट आयडी अन् कंपनीला ९६ लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न, 'या' एका कृतीने आर्थिक अनर्थ टळला

​Nashik Crime News : सायबर गुन्हेगार आता केवळ ओटीपी किंवा लिंक पाठवूनच नाही, तर कंपनीच्या सीईओचं बनावट प्रोफाइल तयार करूनही लाखोंची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीसोबत असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्सवर सीईओचा बनावट आयडी तयार करून तब्बल ९६ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडण्यात आलं. मात्र कंपनीच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फटका टळला.याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोड परिसरातील प्रतिष्ठित ‘रेस सॉफ्टवेअर अँड एज्युकेशन टेक्नॉलॉजिज प्रा. लि.’ या कंपनीचे संचालक सुरेश चंद्र मल्होत्रा (वय ८८) यांनी या प्रकरणी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ( Nashik Crime News )



नेमकं प्रकरण काय ?


​२२ जुलै रोजी कंपनीचे मुख्य संचालक (डायरेक्टर) राहुल मल्होत्रा (Rahul Malhotra) हे कामानिमित्त अमेरिकेत असताना सायबर भामट्याने त्यांच्या नावाने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर हुबेहूब बनावट प्रोफाइल तयार केलं. या प्रोफाइलवरून कंपनीच्या अकाउंट्स हेड अंजली मुळे यांच्याशी संपर्क साधत, "मी सरकारी प्रकल्पाच्या महत्त्वाच्या बैठकीत आहे," असा बनाव रचण्यात आला. त्यानंतर गोपनीय व्यवहार असल्याचं सांगत कोटक महिंद्रा बँकेच्या उडुपी शाखेतील एका खात्यावर तातडीने ९६ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ( Nashik Crime News )



फसवणुकीचा प्रकार 'असा' उघडकीस


अंजली मुळे यांनी थेट फोनवर बोलण्याची विनंती केली असता, बैठकीत असल्याचं कारण देत आरोपीने संभाषण टाळलं आणि तातडीचा दबाव निर्माण केला. सीईओंच्याच सूचना असल्याचा समज झाल्याने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून बँकेत आरटीजीएस फॉर्म जमा करण्यात आला. व्यवहारानंतर संशय आल्याने अंजली मुळे यांनी राहुल मल्होत्रा यांच्या मूळ व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून व्यवहार रोखण्याची आणि रक्कम गोठवण्याची विनंती केली. कंपनी आणि बँकेच्या तत्परतेमुळे मोठा आर्थिक अनर्थ टळला.
( Nashik Crime News )



अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा


या प्रकरणी कंपनीचे संचालक सुरेश चंद्र मल्होत्रा यांनी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान एक छोटी चूक कंपनीला किती महागात पडली असती हे या घटनेतून दिसून येत.

Comments
Add Comment

Dattatray Bharne : शेतकऱ्यांकडून २ लाखांच्या आतील कर्जाची भरपाई घेऊ नका

 कृषिमंत्री दत्ता भरणे; शेतकऱ्यांना सातबारा कोरा झाल्याचे प्रमाणपत्र देणार मुंबई : 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी

Thane District Hospital : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम 'फास्टट्रॅक'वर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत

Nashik : बंदिस्त पुरचारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जितेंद्र पापळकर

Nashik : बंदिस्त पुरचारी ही जलसंधारण विभागाची पहिली योजना असून, अशा योजनांमुळे पाणी शेवटच्या घटकापर्यंत अतिशय कमी

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Union Minister Jitendra Singh : परीक्षा सुधारणा विधेयक भारतीय संसदेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांच्या प्रतिबंधासाठी) सुधारणा विधेयक, २०२६ वर चर्चा सुरू झाली