Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. पत्रकारितेतील चिंतनशील, व्रतस्थ व्यक्तिमत्त्व आणि विविध विषयांचे गाढे अभ्यासक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, राजकारण आणि सिंचन अनुशेष हे लक्ष्मणराव जोशी यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. पत्रकार म्हणून एखादा प्रकल्प दत्तक घेऊन त्यावर सातत्याने लेखन करण्याची परंपरा त्यांनी रुजवली. गोसीखुर्द प्रकल्पावर त्यांनी केलेले विपुल लेखन त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.


लक्ष्मणराव जोशी यांनी 'तरुण भारत'मध्ये प्रदीर्घ काळ सेवा बजावत मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. निवृत्तीनंतरही त्यांनी गोवा आणि इतर ठिकाणच्या विविध वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून कार्य केले. तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातूनही त्यांनी आपली लेखणी अखेरपर्यंत सक्रिय ठेवली.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "संपादकपदावर असतानाही हाडाचे पत्रकार कसे असतात, याचे लक्ष्मणराव जोशी हे मूर्तिमंत उदाहरण होते. माझ्या वडिलांच्या काळापासून त्यांचा परिचय होता. त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने अभ्यासू आणि पितृतुल्य व्यक्तिमत्त्व मी गमावले आहे."


लक्ष्मणराव जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.