मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभाग, सीबीआयने एका लाचखोरी प्रकरणात आयआरसीटीसी मुंबईच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि कोलकाता इथल्या मेसर्स अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.चे संचालक यांना अटक केली आहे. सीबीआयने 22 जुलै 2026 रोजी या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. या सरकारी अधिकाऱ्याने एका खाजगी व्यवसायिकासह इतरांसोबत संगनमत करून, आपल्या पदाचा गैरवापर करत, मोबदल्याच्या स्वरूपात त्यासाठी लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.
Diet Tips : Weight Loss साठी तांदूळ खावा की गहू ?
Weight Loss करायचा आहे ? मग काय उत्तम भाकरी, भात की चपाती ? वजन कमी करायला काय करावं ? असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर आहारतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
वजन कमी ...
तक्रारीनुसार, संबंधित सार्वजनिक सेवकाने 21 एप्रिल 2026 रोजी 1,98,500 रुपये आणि 8 जून 2026 रोजी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेतील त्याच्या बँक खात्यात रोख स्वरूपात जमा करण्यात आली होती. मेसर्स अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांनी सादर केलेल्या प्रलंबित बिलांना मंजुरी
मिळवून देण्यासाठी अथवा त्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या मोबदल्यात ही रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. या दोन्ही वेळा संबंधित खासगी कंपनीच्या संचालकाच्या एका सहकाऱ्याने ही रोख रक्कम बँक खात्यात जमा केल्याचेही आरोपात नमूद करण्यात आले आहे. 22 जुलै 2026 रोजी केलेल्या तपासादरम्यान, मुंबई इथल्या, आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागीय कार्यालयात दोन्ही आरोपींची 3,98, 500 रुपयांच्या लाचेची मागणी आणि लाच घेणे, याबद्दल समक्ष चौकशी करण्यात आली. यावेळी संबंधित खासगी कंपनीच्या संचालकाच्या ताब्यातील बॅगेत 4, 49,500 रुपये आणि 13,200 रुपये इतकी रोख रक्कम आढळून आली.
Shimla Accident : हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, १३ जणांचा मृत्यू तर सहा महिन्याच्या बाळाचा...
शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या एका टाटा सुमो कारवर दरड ...
आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये आक्षेपार्ह व्हॉट्सॲप चॅट्सही आढळले. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम सीबीआयने ताब्यात घेतली असून, दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून सीलबंद करण्यात आले आहेत. तसेच मेसर्स अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांनी सादर केलेल्या संबंधित फाईल्स आणि बिलेही जप्त करण्यात आली आहेत. सरकारी अधिकारी आणि संचालक यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना 22 जुलै 2026 रोजी अटक करून विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 27 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.