शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या एका टाटा सुमो कारवर दरड कोसळल्याने बाळासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या सुमो कारमध्ये १५ जण प्रवास करत होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
View this post on Instagram
Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात धुवांधार पावसाने नदी-नाले ...
लाहौल घाटापासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर कुडूमाला परिसरात अपघात झाला आहे. घाटातून जाताना सुमो एसयूव्हीवर डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुमोची फक्त नंबर प्लेट दिसत आहे. घटनेत सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.भरमौर-पाँगीचे आमदार जनक राज यांनी अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली. पांगी-उदयपूर मार्गावर ज्या सुमोचा अपघात त्या गाडीत १५ जण होते. गाडीतील १३ जणांचा अपघातात मृत्यू झाला, असे आमदार जनक राज यांनी सांगितले.
Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. ...
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण आहे की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. डोंगरावरून दगड कोसळल्यानंतर गाडीच्या मागील भागात आग लागली, जी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आणि जवानांनी विझवण्याचा प्रयत्न केला. (Shimla Accident)
Neet Paper leak : नीट पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार, दोषींना कठोर शिक्षा होणार
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी अटक केलेल्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार आहे. दोषींना १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासासह १० कोटी ...
महामार्ग काही दिवस होता बंद
काही दिवसांपासून उदयपूर-किलाड मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यामुळे पर्यटकांची वाहने तिंदी परिसरात थांबवली जात होती. मार्ग सुरू झाल्यानंतर ही अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी मंडी जिल्ह्यातील जोगिंद्रनगर येथील गुम्मामध्ये भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये दोन कुटुंबं मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये आठवड्याभरात दोन मोठ्या दुर्घटना झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






