मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमधील नो-बॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता एखाद्या गोलंदाजाने जाणीवपूर्वक नो-बॉल किंवा धोकादायक बीमर टाकला, तर त्याच्यावर थेट संपूर्ण सामन्यासाठी बंदी घालण्यात येऊ शकते. यासोबतच मॅच फिक्सिंग आणि संशयास्पद निकाल रोखण्यासाठी अंतिम टप्प्यात डाव घोषित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. (BCCI )
पुणे: पुण्यातील कात्रज तलाव परिसरात सोमवारी रात्री एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात अवघ्या 30 ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची नियमावली ठरवणाऱ्या मेलबर्न क्रिकेट क्लबने यापूर्वी बीसीसीआयला नियमांमध्ये काही बदल सुचवले होते. बीसीसीआयने आता ते बदल स्वीकारले आहेत. त्यानुसार हे नियम बदलण्यात आले आहेत. हे सर्व नवीन नियम राज्यातील सर्व क्रिकेट बोर्डांकडे पाठवण्यात आले आहेत.नवीन नियमानुसार, जाणीवपूर्वक नो-बॉल टाकल्याबद्दल निलंबित झालेल्या गोलंदाजाला आता संपूर्ण सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. मात्र, नियमावलीच्या ४१.८ अंतर्गत हा निर्णय घेण्याचा अधिकार मैदानातील अंपायरचा आहे,असे बीसीसीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. पुढच्या महिन्यापासून दुलीप ट्रॉफीमध्ये हे सर्व नवीन नियम लागू केले जाणार आहेत.(BCCI )
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) ...
दिवसाच्या समाप्तीबाबत बीसीसीआयचे महत्त्वाचा निर्णय
बीसीसीआयने आणखी एका नियमामध्ये मोठा बदल केला आहे. दिवसाच्या शेवटच्या षटकात जर फलंदाज बाद झाला, तर फलंदाजी संघाला ते षटक पूर्ण खेळावे लागेल. जुन्या नियमामुळे संघांना दिवसाच्या शेवटी नवीन फलंदाज मैदानात पाठवण्यापासून रोखले जात होते आणि फलंदाज शेवटच्या षटकात बाद झाल्यास तेथेच खेळ थांबवण्यात येत होता. मात्र आता, असं करता येणार नाही. (No-Ball)
लंडन: फुटबॉल जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत पंच म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रसिद्ध इंग्लिश रेफरी अँथनी टेलर ...
बीसीसीआयने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार, संघांना आता सामन्याच्या अंतिम टप्प्यात डाव घोषित किंवा डाव सोडून देता येणार नाही. पूर्वनियोजित किंवा संशयास्पद निकाल लावण्यासाठी या नियमाचा गैरवापर केला जात असल्याचे आणि हे क्रिकेटच्या खेळासाठी घातक असल्याचे क्रिकेट मंडळाचे मत आहे. त्यामुळे नव्या हंगामापासून सामन्याच्या शेवटच्या डावात डाव घोषित करता येणार नाही. याबरोबरच एकदिवसीय सामन्यांमध्ये जलपानाच्या विश्रांतीला मुख्य प्रशिक्षकांना मैदानात जाऊन खेळाडूंशी चर्चा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टिरक्षकांसाठी आता चेंडू टाकण्याच्या क्षणीच आपले ग्लोव्हज यष्ट्यांच्या मागे असणे आवश्यक असेल. पूर्वी, गोलंदाजाने धाव घेण्यास (रन अप) सुरुवात केल्यापासूनच हातमोजे यष्ट्यांच्या मागे ठेवावे लागत होते. जुन्या नियमामुळे काही वेळा यष्टिरक्षकाचा चेंडू नो-बॉल ठरवला जायचा किंवा यष्टीचीत बाद दिलेले अमान्य केले जायचे.





