Monday, July 20, 2026

FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रातील फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर २० जुलै रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपाहारगृहे सुरू ठेवण्यास विशेष परवानगी दिली आहे. (FIFA World Cup Final 2026)

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना आता मोठ्या स्क्रीनवर मित्र-परिवारासोबत अंतिम सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. (FIFA World Cup Final 2026)

'या' अटींवर मिळाली परवानगी :

शासनाने दिलेल्या आदेशानुसार, ही विशेष परवानगी २० जुलै २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंतच लागू असेल. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. (FIFA World Cup Final 2026)

- कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची असेल. - आस्थापनाच्या आत किंवा बाहेर ध्वनीप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. - कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी आस्थापन चालकांवर राहील. - स्थानिक पोलीस प्रशासनाला आवश्यक वाटल्यास ही परवानगी रद्द करण्याचा अधिकार असेल. (FIFA World Cup Final 2026)

फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह :

यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत देशभरात प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि इतर शहरांतील अनेक हॉटेल्स व स्पोर्ट्स कॅफेंमध्ये मोठ्या स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मध्यरात्री सुरू होणारा अंतिम सामना आता फुटबॉलप्रेमींना अधिक आरामात आणि उत्साहात पाहता येणार आहे. (FIFA World Cup Final 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >