Nashik : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात (Bhavali Dam Area) पर्यटकांना मारहाण करून फरार झालेले तीन मुख्य आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी फरार असलेल्या कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडु या संशयित आरोपींना आज ताब्यात घेतलंय. (Nashik Crime News)
मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत भारत स्टेशन ...
नेमकं प्रकरण काय ?
नाशिक शहरातील एक कुटुंब रविवारी ८ सदस्यांसह इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भावली धरणावर फिरण्यासाठी गेलं होतं. फिरून झाल्यानंतर घरी परतत असताना कुटुंबातील एका महिलेची दोन टवाळखोरांनी छेड काढली. या प्रकारावर संतापलेल्या त्यांच्या पतीने आक्षेप घेत, “सार्वजनिक ठिकाणी असे वागणे योग्य आहे का?” असा जाब विचारला. यावरून टवाळखोरांनी वाद कुटूंबीयांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली धक्कादायक म्हणजे वार घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न हुल्लडबाजांनी केला. कित्येक किलोमीटर त्यांचा पाठलाग केला सोबतच त्यांना मारहाणही करण्यात आली. यातील ९ संशयित आरोपींना पोलीसांनी दोन दिवसांपूर्वी अटक (Arrested) केली होती. मात्र, हल्ला करून तीन मुख्य आरोपी फरार झाले होते. अखेर आज पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. (Nashik Crime News)
मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी ...
महिलेने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
दरम्यान, आपल्यावर ओढवलेल्या थरारक प्रसंगाचा घटनाक्रम या महिलेनं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. महिलेनं सांगितलं की, परवा आम्ही फिरायला गेलो होतो. दुपारी 2 वाजता इच्छित स्थळी पोहोचलो. आमच्या मुलांनी धबधबा एन्जॉय केला. त्यानंतर मी कपडे बदलायला गेले, त्यावेळी माझ्यावर दोन जणांनी कमेंट पास केली. त्यानंतर त्यांनी परत माझ्यावर कमेंट केली. नेमकं काय झालंय हे पाहायला मग माझे पती आले आणि त्यांनी या गुडांना जाब विचारला. त्यावेळी आमच्यासमोर एका दुकानावर 8 ते 10 जण उभे होते. त्यांनी माझ्या पतीसोबत हातपाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे एक बलेनो गाडी आली, त्यातून एकानं हातानं आमच्या गाडीच्या काचा फोडल्या. पुढे गेल्यावर त्यांनी आमचा पाठलाग केला. रॉडनं आमच्या गाडीवर हल्ला केला. (Nashik Crime News)
पहिल्यांदा आमच्यावर भावली डॅम इथं या गुडांनी हल्ला केला. नंतर टोल नाक्यावर हल्ला केला, नंतर पुन्हा दगड मारून हल्ला केला. शेवटी आम्ही जीव वाचवण्यासाठी बॅरिकेड्स तोडून तिथून पळालो. नंतरही ते आमच्या पुढे आले. मग आम्ही मुंबईच्या बाजूला गाडी वळवली आणि पळालो. त्यातील एक जण आमच्या गाडीला लटकला. आम्ही थांबू सुद्धा शकत नव्हतो. मागून बलेनो कार पुन्हा आमचा पाठलाग करत होती. नंतर काही स्थानिक लोक आमच्या रस्त्यात उभे होते, त्यांच्याकडं आम्ही मदत मागितली. त्यानंतर मागून आलेल्या मुलाने मला धरलं. त्याठिकाणी झटापटीत माझी सोन्याची चैन हरवली. तिथून आम्ही थेट अंबड पोलिस स्टेशन पोहोचलो. या ठिकाणी आल्यानंतर झिरो FIR ने गुन्हा दाखल झाला. (Nashik Crime News)
Nashik : गुरुवारी नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नाशिकमधील विविध बहुचर्चित म्हाडा घोटाळा (mhada scam) त्यासोबतच ...
काल स्पॉट पंचनामा झाला. पोलिसांनी आम्हाला दोन गाड्यांचं संरक्षण दिलं. या गुंडांना मुली, बायका काहीच दिसत नव्हतं, आम्ही जर तिथं थांबलो असतो तर आमच्या कुटुंबापैकी कोणाचा मृत्यू झाला असता माहीत नाही. आम्ही 20 ते 30 किलोमीटरपर्यंत मरण बघत आलो. त्यांना खूपच राग होता तर त्यांनी एकदा मारलं असतं. पण 30 किलोमीटर पाठलाग करून त्यांना आमचा मर्डर करायचा होता. आम्ही पोलिसांना फोन केला, मात्र रेंज नव्हती. केस दाखल करू नका यासाठी एका अज्ञात व्यक्तीनं आम्हाला 10 लाख रुपयांची ऑफरही दिली. (Nashik Crime News)
असा अंगावर काटा आणणारा थरारक प्रसंग पीडित कुटुंबातील महिलेनं पत्रकार परिषदेत कथन केला. तसंच गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी या पीडित कुटुंबीयांनं पोलिसाकडं केली आहे. तसंच पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं, असंही या पीडित महिलेनं म्हटलं आहे.






