अटलांटा: फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडवर २-१ ने विजय मिळवल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी मैदानावर केलेला आनंदोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामना संपल्यानंतर मिडफिल्डर जिओवानी लो सेल्सो आणि बचावपटू निकोलस ओटामेंडी यांनी "लास माल्विनास सोन अर्जेंटिनास" (Las Malvinas son Argentinas) असे लिहिलेला एक बॅनर फडकवला. या घटनेमुळे अर्जेंटिनाला फिफाकडून शिस्तभंग कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये लिओनेल मेस्सी (FIFA World Cup 2026 Lionel Messi) पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील २-१ अशा रोमांचक ...
वादाचे मूळ: 'लास माल्विनास' म्हणजे काय?
'लास माल्विनास' हे अर्जेंटिनाने फॉकलंड बेटांसाठी वापरलेले नाव आहे. ही बेटे अर्जेंटिनाच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे ४८० किलोमीटर अंतरावर असलेला एक ब्रिटिश परदेशीय प्रदेश आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिना यांच्यातील या बेटांच्या सार्वभौमत्वाचा वाद १९व्या शतकापासून सुरू आहे. १९८२ मध्ये या बेटांच्या ताबा मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ७४ दिवसांचे युद्ध झाले होते, ज्यामध्ये ६४९ अर्जेंटिनी सैनिक आणि २५५ ब्रिटिश सैनिकांचा मृत्यू झाला होता.
अटलांटा : लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने (Argentina) पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Comeback) करत इंग्लंडचा (England) २-१ असा पराभव केला आणि सलग ...
फिफाचे कडक नियम काय आहेत?
फिफा आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळ (IFAB) यांच्या नियमांनुसार, सामन्यांदरम्यान खेळाडूंना कोणत्याही प्रकारचे राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक संदेश, घोषणा किंवा चिन्हे प्रदर्शित करण्यास सक्त मनाई आहे.
-
IFAB नियमावली: नियमावलीनुसार, खेळाडूंच्या कपड्यांवर किंवा मैदानावरील कोणत्याही साधनावर राजकीय घोषणा नसाव्यात. अशा कोणत्याही उल्लंघनासाठी संबंधित खेळाडू किंवा संघावर फिफा दंड आकारू शकते.
-
इतिहास: २०१४ मध्येही, स्लोव्हेनियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यापूर्वी असाच बॅनर प्रदर्शित केल्यामुळे अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनला २०,००० पाउंडचा दंड ठोठावण्यात आला होता.
नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील प्रभावी कामगिरीबद्दल भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेलला (Axar Patel) ...
अर्जेंटिनाची अधिकृत भूमिका
या घटनेनंतर, अर्जेंटिनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत विधान जारी करत फॉकलंड बेटांवरील देशाचा दावा पुन्हा एकदा ठामपणे मांडला आहे. उपराष्ट्रपती व्हिक्टोरिया व्हिलारुएल यांनी एक्स (X) वर पोस्ट करत म्हटले आहे की, "फॉकलँड्स अर्जेंटिनाचे आहेत! त्यांनी स्टेडियममध्ये येण्यास बंदी घातली असली तरी, ते आमच्या रक्तात आणि हृदयात आहेत."
¡Las Malvinas son Argentinas! 🇦🇷 Prohibieron llevarlas a la cancha y se olvidaron que las llevamos en la sangre y el corazón. pic.twitter.com/qB455HeqVX
— Victoria Villarruel (@VickyVillarruel) July 15, 2026
सध्या फिफाकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु खेळाच्या मैदानावरील या राजकीय प्रदर्शनामुळे अर्जेंटिनाला आर्थिक दंड किंवा औपचारिक इशाऱ्याला सामोरे जावे लागू शकते. अर्जेंटिनाचा संघ आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात स्पेनशी भिडणार आहे.



