नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीत भारतीय संघ 'थोडा मागे' आहे आणि न्यूझीलंड दौऱ्यावर श्रीलंकेतील प्रभावी कामगिरीची पुनरावृत्ती करणे कठीण होईल. दोनदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांना आपले उर्वरित बहुतेक सामने जिंकावे लागतील. पुढील वर्षी होणारा अंतिम सामना अव्वल दोन संघांमध्ये खेळला जाईल. जानेवारी २०२७ मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामने खेळेल. या दौऱ्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय आणि तितकेच टी-२० सामनेही खेळेल.
द्रविडने सांगितले की, भारत डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी होईल अशी त्यांना आशा आहे. सध्याची परिस्थिती असूनही जर भारत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला, तर ती एक उल्लेखनीय कामगिरी असेल. तो म्हणाला की, भारतीय संघ मागे पडत आहे असे वाटत असले तरी, तो एक खूप मजबूत संघ आहे आणि कोणत्याही स्तरावर त्याला कमी लेखता येणार नाही. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध चांगली सुरुवात केली, त्यामुळे पहिले पाऊल खूप चांगले आहे.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या १४ वर्षीय मुलीचा बारामतीत दुर्दैवी ...
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दुसऱ्या कसोटीतही त्यांचे पारडे जड आहे. ऑक्टोबरमधील न्यूझीलंड दौऱ्याबाबत द्रविड म्हणाला की, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या निवृत्त क्रिकेचपटूंच्या अनुभवाची कमतरता दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये जाणवेल. तो म्हणाला की, न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणे हे नेहमीच एक आव्हान असते. न्यूझीलंडचा संघ एक मोठे आव्हान उभे करतो. भारताचे अनेक तरुण क्रिकेटपटू न्यूझीलंडसारख्या परिस्थितीत खेळलेले नाहीत, त्यामुळे हे एक मोठे आव्हान असेल. द्रविड म्हणाला की, भारतीय क्रिकेटपटू दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असतील अशी आशा असली तरी, त्यांना विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या अनुभवी क्रिकेटपटूंची उणीव भासेल. भारताचा माजी कर्णधार म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील मालिकाही सोपी असणार नाही.






