फिफा विश्वचषक २०२६ मध्ये लिओनेल मेस्सी (FIFA World Cup 2026 Lionel Messi) पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील २-१ अशा रोमांचक विजयात दोन निर्णायक असिस्ट करत त्याने अर्जेंटिनाला विक्रमी सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवले. याच कामगिरीमुळे मेस्सीने गोल्डन बूटच्या शर्यतीतही फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर कायलियन एमबाप्पेला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
अटलांटा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अँथनी गॉर्डनच्या ५५व्या मिनिटातील गोलमुळे इंग्लंड ८५व्या मिनिटापर्यंत आघाडीवर होता. मात्र, अखेरच्या क्षणी मेस्सीने आपली जादू दाखवली. त्याने बचावफळीला चकवत एन्झो फर्नांडिसला अचूक पास दिला आणि फर्नांडिसने ८५व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. अतिरिक्त वेळेत मेस्सीच्या अचूक क्रॉसवर लॉटारो मार्टिनेझने हेडरद्वारे विजयी गोल झळकावत अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (FIFA World Cup 2026 Lionel Messi)
अटलांटा : लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने (Argentina) पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Comeback) करत इंग्लंडचा (England) २-१ असा पराभव केला आणि सलग ...
या दोन असिस्टमुळे मेस्सीच्या खात्यात आता आठ गोल आणि चार असिस्ट जमा झाले आहेत. त्यामुळे तो गोल्डन बूटच्या शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचला असून, आठ गोल आणि तीन असिस्ट असलेल्या फ्रान्सच्या कायलियन एमबाप्पेला त्याने मागे टाकले आहे.
या विश्वचषकात मेस्सीने अल्जेरियाविरुद्ध हॅट्ट्रिक करत शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर ऑस्ट्रियाविरुद्ध दोन गोल, जॉर्डनविरुद्ध फ्री-किकवर गोल, काबो वर्देविरुद्ध राऊंड ऑफ ३२ मध्ये एक गोल, तर इजिप्तविरुद्ध राऊंड ऑफ १६ मध्ये एक गोल आणि एक असिस्ट अशी दमदार कामगिरी त्याने केली. स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतही त्याने निर्णायक असिस्ट नोंदवला होता. (FIFA World Cup 2026 Lionel Messi)
इंग्लंडविरुद्धच्या दोन असिस्टमुळे मेस्सीने विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक असिस्ट करणाऱ्या खेळाडूचा विक्रम आणखी भक्कम केला आहे. आता त्याच्या नावावर तब्बल १२ असिस्ट आहेत, ज्यापैकी १० असिस्ट बाद फेरीतील सामन्यांमध्ये आले आहेत. तसेच, विश्वचषकाच्या सहा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये किमान एक असिस्ट करणारा तो पहिलाच फुटबॉलपटू ठरला आहे. या बाबतीत त्याने दिएगो मॅराडोना (८ असिस्ट) आणि जर्मनीचा पिअर लिटबार्स्की (७ असिस्ट) यांनाही मागे टाकले आहे. (FIFA World Cup 2026 Lionel Messi)
वेम्बली: इंग्लंडच्या फुटबॉल इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर, 'थ्री लायन्स' संघ बुधवारी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना ...
आता मेस्सीसमोर दुहेरी इतिहास रचण्याची संधी आहे. अर्जेंटिनाला विश्वविजेते बनवण्याबरोबरच गोल्डन बूट जिंकण्याचाही तो प्रबळ दावेदार आहे. मात्र, ही शर्यत अद्याप संपलेली नाही. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना एमबाप्पेला गोलसंख्येत भर घालण्याची अखेरची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, अंतिम फेरीत मेस्सी ट्रॉफी आणि गोल्डन बूट या दोन्हीवर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. (FIFA World Cup 2026 Lionel Messi)
View this post on Instagram





