Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! गोव्याहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ३ जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा रेस्ट हाऊसजवळ बुधवारी (१५ जुलै) सकाळी झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)



डंपरला कारची जोरदार धडक :


माहितीनुसार, मुंबईतील आग्रीपाडा परिसरात राहणारे हे कुटुंब गोव्यातून फिरून क्रेटा कारने मुंबईकडे परतत होते. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास लांजा रेस्ट हाऊसजवळ त्यांच्या कारने पुढे जात असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की क्रेटा कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारमधील दोन महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)



जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू :


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)



परतीचा प्रवास ठरला अखेरचा :


गोव्यातील सहल आटोपून आनंदाने मुंबईकडे निघालेल्या या कुटुंबावर काही क्षणांतच काळाने घाला घातला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)

Comments
Add Comment

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Jalgaon : जळगाव-ममुराबाद मार्गावर भीषण अपघात, कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू ; संतप्त जमावाने वाहन पेटवले

Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण

Maharashtra Farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! देशी बैलजोडी खरेदीसाठी मिळणार १.२६ लाखांपर्यंत अनुदान; असा करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी देशी बैलजोडी