मुंबई : ऑनलाईन (Online) कॅब बुक (Cab Book) करणे किंवा पर्सनल ट्रेनर (Personal Trainer) शोधणे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र, आता भारतात 'Rent Boyfriend' (रेंट बॉयफ्रेंड) ही संकल्पना चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडिया (Social Media), फेसबुक (Facebook) ग्रुप्स, इन्स्टाग्राम (Instagram) पेजेस आणि काही डिजिटल (Digital) प्लॅटफॉर्म्सवर तासाच्या हिशोबाने बॉयफ्रेंड बुक (Book) करण्याच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत.
या सेवेत शॉपिंग (Shopping), मुव्ही (Movie), क्लबिंग (Clubbing), मेडिकल सपोर्ट (Medical Support) किंवा इतर सोशल कंपनी (Social Company) देण्यासाठी पैसे देऊन व्यक्तीची साथ मिळते. मात्र, ही सेवा केवळ व्यावसायिक (Professional) स्वरूपाची असून तिच्यावर अनेक कडक नियम लागू असतात.
जपानमधून झाली सुरुवात
'Rent Boyfriend' आणि 'Rental Girlfriend' (रेंटल गर्लफ्रेंड) या सेवांची सुरुवात 1990 च्या दशकात जपानमध्ये झाली. वाढता एकटेपणा (Loneliness) आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सोबत मिळावी यासाठी ही संकल्पना पुढे आली. २०१० नंतर या सेवेला व्यावसायिक (Professional) स्वरूप मिळाले. टोक्यो (Tokyo)मध्ये या सेवेसाठी साधारण ३००० ते ६००० येन म्हणजेच १७०० ते ३५०० रुपये प्रति तास इतके शुल्क आकारले जाते.
FIFA World Cup 2026 : FIFA World Cup 2026 च्या पहिल्या सेमी फायनल (Semi Final) सामन्यात युरोपियन चॅम्पियन स्पेनने (Spain) फ्रान्सचा (France) २-० असा पराभव करत दिमाखात फायनल (Final) गाठले. स्पेनच्या ...
Rules (नियम) आहेत अतिशय कडक
ही सेवा केवळ सोशल सपोर्ट (Social Support) आणि कंपनी (Company) देण्यासाठी असते. त्यामुळे काही कठोर नियम पाळावे लागतात.
- कोणत्याही प्रकारच्या लैंगिक (Sexual) संबंधांना परवानगी नाही.
- हॉटेल (Hotel) रूममध्ये जाण्यास बंदी.
- निर्जन किंवा एकांत ठिकाणी जाण्यास मनाई.
- रात्रभर एकत्र राहण्याची परवानगी नाही.
- ग्राहकाने आदरयुक्त वर्तन करणे बंधनकारक.
Social Media (सोशल मीडिया)मुळे वाढली लोकप्रियता
युट्यूब (YouTube), इन्स्टाग्राम आणि टिकटॉक (TikTok)वरील अनेक कंटेंट क्रिएटर्सनी (Content Creators) जपानमधील हा अनुभव व्हिडिओ (Video)च्या माध्यमातून शेअर केला. "I Rented a Boyfriend in Tokyo" अशा व्हिडिओंना लाखो व्ह्यूज (Views) मिळाल्यानंतर हा ट्रेंड जगभर पोहोचला. एका युट्यूबरने (YouTuber) तब्बल १०० डॉलर (सुमारे ८५०० रुपये) देऊन बॉयफ्रेंड भाड्याने घेतल्याचा अनुभवही शेअर केला होता.
भारतात काय आहे परिस्थिती?
भारतात अद्याप जपानसारखी अधिकृत एजन्सी (Agency) व्यवस्था नाही. मात्र, फेसबुक ग्रुप्स, इन्स्टाग्राम पेजेस आणि काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर अनेक तरुण स्वतःला 'Rent Boyfriend' म्हणून प्रमोट (Promote) करत आहेत. काही वेबसाइट्स (Websites) या सेवेला Professional Social Support Services (प्रोफेशनल सोशल सपोर्ट सर्व्हिसेस) असे संबोधतात.
FIFA World Cup 2026 : FIFA World Cup 2026 च्या उपांत्य फेरीत (Semi Final) स्पेनने आपल्या प्रसिद्ध टिकी-टाका (Tiki-Taka) शैलीचा अप्रतिम नमुना सादर करत फ्रान्सचा २-० असा पराभव केला. डॅलस ...
Rate Card (रेट कार्ड) किती?
काही प्लॅटफॉर्म्सवर खालीलप्रमाणे दर (Charges) नमूद करण्यात आले आहेत.
- Hangout (हँगआऊट) – ₹१५०० प्रति तास
- Clubbing (क्लबिंग) – ₹२००० प्रति तास
- Movie Partner (मुव्ही पार्टनर) – ₹२००० प्रति तास
- Shopping Buddy (शॉपिंग बडी) – ₹२००० प्रति तास
- Medical Support (मेडिकल सपोर्ट) – ₹२००० प्रति तास
Instagram (इन्स्टाग्राम) आणि Dating Apps (डेटिंग ॲप्स)चा वापर
इन्स्टाग्रामवरील काही पेजेसवर कॉफी डेट (Coffee Date), शॉपिंग ट्रिप (Shopping Trip) आणि इव्हेंट (Event)साठी साथीदार उपलब्ध असल्याच्या जाहिराती दिल्या जात आहेत.
काही जण डेटिंग ॲप्स (Dating Apps)च्या बायोमध्ये "Paid Company Only" किंवा "Available for Events" असे लिहून स्वतःची सेवा उपलब्ध असल्याचे नमूद करतात. काही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारतीय प्रोफाइल्स ११ ते १५ डॉलर प्रति तास या दरानेही उपलब्ध असल्याचे दिसते.
कोण वापरतं ही सेवा?
या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने कॉलेज (College) विद्यार्थी आणि पार्ट-टाईम (Part-time) कमाई करू इच्छिणारे तरुण आहेत. तर या सेवांचा वापर करणाऱ्यांमध्ये मोठ्या शहरांतील २० ते ३० वयोगटातील महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.
काही जणी सोशल मीडिया कंटेंट (Content) तयार करण्यासाठी, तर काही नवीन शहरात एकटेपणा कमी करण्यासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी सोबत मिळावी म्हणून या सेवेचा पर्याय निवडतात.
बदलत्या नात्यांचा नवा ट्रेंड?
व्यस्त जीवनशैली (Lifestyle), वाढता एकटेपणा आणि डिजिटल (Digital) जगामुळे अशा सेवांकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. काहींसाठी हा अतिरिक्त कमाईचा पर्याय आहे, तर काहींसाठी सोशल कंपनी (Social Company) मिळवण्याचा मार्ग.
मात्र, ही सेवा पूर्णपणे व्यावसायिक (Professional) स्वरूपाची असून, त्यामध्ये स्पष्ट नियम आणि मर्यादा पाळल्या जातात. त्यामुळे बदलत्या काळात नातेसंबंधांची व्याख्या आणि मानवी संवादाचे स्वरूप कसे बदलत आहे, याकडेही या ट्रेंडमुळे लक्ष वेधले जात आहे.