Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संचलित मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मेट्रो मार्गिका २अ (दहिसर पूर्व–अंधेरी पश्चिम), मार्गिका ७ (दहिसर पूर्व–गुंदवली), मार्गिका २ब (डायमंड गार्डन–मंडाळे, टप्पा-१) आणि मार्गिका ९ (दहिसर पूर्व–काशीगाव, टप्पा-१) या मार्गांवर ३ ऑगस्ट २०२६ रोजी हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक म्हणून मुंबईकरांनी मेट्रोला दिलेल्या वाढत्या पसंतीचे हे प्रतीक मानले जात आहे. (MMRDA Metro)


या कामगिरीतील विशेष बाब म्हणजे शेवटचे ५ कोटी प्रवासी अवघ्या १७९ दिवसांत नोंदवले गेले, जो आतापर्यंतचा सर्वात वेगवान टप्पा ठरला आहे. या कालावधीत सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७० लाखांवरून २.७९ लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यात ३.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि हंगामी प्रवासाचा परिणाम असूनही ही वाढ कायम राहिल्याचे एमएमआरडीएने सांगितले. (Mumbai Metro)



२ एप्रिल २०२२ रोजी मेट्रो मार्गिका २अ आणि ७ सुरू झाल्यानंतर प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ रोजी मार्गिका २ब (टप्पा-१) आणि मार्गिका ९ (टप्पा-१) सुरू झाल्याने नेटवर्कमध्ये नऊ नवीन स्थानकांची भर पडली आणि संपर्कक्षमता आणखी मजबूत झाली. (Mumbai Transport)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० कोटी प्रवाशांचा टप्पा हा मुंबईकरांनी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर व्यक्त केलेल्या विश्वासाचा पुरावा असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनीही हा टप्पा जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे नमूद करत, भविष्यात संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश अखंड मेट्रो नेटवर्कने जोडण्याचा संकल्प व्यक्त केला.



एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रो सेवा सुरक्षित, विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाची ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा मेट्रोवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला समर्पित असल्याचे सांगितले. (City Development)

Comments
Add Comment

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Jalgaon : जळगाव-ममुराबाद मार्गावर भीषण अपघात, कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू ; संतप्त जमावाने वाहन पेटवले

Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण