Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्नेहल ज्ञानदेव बेंदे हिच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.



नेमकं काय घडलं ?


फिर्यादी प्रीती बोठे ही विद्यानगर येथील रहिवासी असून प्रीती बोठे यांच्या घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये दैनंदिन वापरातील सोन्याचे दागिने तसेच व्यवसाय व बचत गटाचे एक लाख रूपये रोख ठेवले होते. स्नेहल बेंदे ही फिर्यादीची मैत्रीण असून दोघी 2022 ते 2025 या कालावधीत न्यू लॉ कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. त्यामुळे तिचे फिर्यादीच्या घरी नियमित येणे-जाणे होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 29 जुलै रोजी दुपारी स्नेहलने मोबाईलवर मेसेज पाठवून तिला मुलगा पाहण्यासाठी येणार असल्याने सांगून साडी हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास ती फिर्यादीच्या घरी आली. (Ahilyanagar Crime News)



कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा


ज्या खोलीत कपाटात दागिने ठेवले होते, त्याच ठिकाणी साड्या असल्याने स्नेहल साडी परिधान करून पाहण्यासाठी त्या खोलीत गेली. त्यावेळी फिर्यादी दुसर्‍या खोलीत असल्याने स्नेहल काही काळ एकटीच बेडरूममध्ये होती. त्यानंतर तिने दोन साड्या घेऊन घरातून निघून गेली. दरम्यान, शनिवारी (1 ऑगस्ट) दुपारी बचत गटातील पैसे घेण्यासाठी एक महिला फिर्यादीच्या घरी आली त्यावेळेस प्रीती या कपाटातून पैसे काढण्यासाठी गेल्या. मात्र, कपाटातील रोख रक्कम दिसून न आल्याने तात्यांनी घाबरलेल्या. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिनेही तपासले मात्र तेही गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी स्नेहल बेंदे हिनेच दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप करत तिच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Ahilyanagar Crime News)



14 तोळ्याचे दागिने लंपास


चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे पाच तोळ्यांचे मिनी गंठण, 2.5 तोळ्यांचे मिनी मंगळसूत्र, दोन तोळ्यांची सोन्याची कर्णफुले, अर्धा तोळ्याचे कानातील दागिने, प्रत्येकी एक तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, अर्धा तोळ्याची सोन्याची नथ, दोन ग्रॅमचे सोन्याचे मणी, दोन ग्रॅमच्या सोन्याच्या फिरक्या आणि एक लाख रूपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि