Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व भव्य पाऊल उचलले आहे. ‘मिशन ग्रीन जळगाव सिटी’ या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात तब्बल १ लाख वृक्षारोपण करण्याचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी १० रोजी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात होणार आहे. जळगाव शहराला हिरवाईची शाल पांघरण्यासाठी व जळगावला प्रदूषणमुक्त आणि नयनरम्य बनवण्यासाठी ही मोहीम एक लोकचळवळ ठरणार आहे.



संगोपनाचीही पूर्ण जबाबदारी !


झाडे लावून ती जगवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने झाडांच्या नियमित पाण्यासह, ट्री-गार्ड (संरक्षक जाळ्या) आणि देखभालीची सक्षम यंत्रणा उभारली आहे. स्थानिक नागरिकांनीही आपापल्या भागातील झाडांचे पालकत्व घ्यावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने यांनी केले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत महापौर दीपमाला काळे (Mayor Deepmala Kale) यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका, सामाजिक संस्था (Social Institutions) व नागरिकांच्या सहयोगाने साकारलेल्या या हरित मोहिमेत केवळ प्रशासनच नाही, तर शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. सोमवारी (दि. १०) मान्यवरांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात होणार आहे.



जळगावचे तापमान आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, शहराला 'ग्रीन कॉरिडॉर' बनवणे ही काळाची गरज आहे. या १ लाख वृक्षारोपणाच्या मोहिमेत प्रत्येक जळगावकराने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा.चला, आपण सर्वजण मिळून या 'मिशन ग्रीन जळगाव'मध्ये सहभागी होऊया आणि आपल्या जळगावला अधिक सुंदर, हिरवेगार नि समृद्ध बनवूया असे आवाहन जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.



असे असेल वृक्षारोपणाचे नियोजन


रस्त्यांचे सुशोभीकरण : शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि महामार्गाच्या दोन्ही दुतर्फा (डिव्हायडर व बाजूला) मोठ्या प्रमाणावर सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली जाईल.


ओपन स्पेसचा वापर : महापालिकेच्या मालकीच्या सर्व मोकळ्या जागा आणि सार्वजनिक भूखंडांवर हिरवाई फुलवली जाणार आहे.


हेमू कलानी उद्यानात 'मियावाकी जंगल' : जळगाव शहरातील प्रसिद्ध हेमू कलानी उद्यानात जपानी तंत्रज्ञानावर आधारित *मियावाकी पद्धती'ने अवघ्या काही काळात घनदाट जंगल उभारले जाईल. येथे तब्बल १५,००० रोपांची विशेष लागवड केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :

Mangalagaur 2026 : यंदा श्रावणात कधी साजरी होणार मंगळागौर ? जाणून घ्या पूजा पद्धत, ५ वर्षांची परंपरा आणि पौराणिक कथा!

मुंबई : श्रावण महिना उजाडला की महाराष्ट्रात महिलांना वेध लागतात ते म्हणजे अत्यंत उत्साहाच्या आणि मांगल्याच्या

Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर 'मनी लाँड्रिंग'चा खटला चालवण्यास 'ईडी'ला राज्यपालांची मंजुरी

मुंबई : बार आणि रेस्टॉरंटमधून कथित १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे

DY Patil Passed Away : ज्यांच्या दूरदृष्टीने भारताला दिले 'हे' ऐतिहासिक मैदान; जिथे भारतीय महिला संघाने जिंकला पहिला वर्ल्ड कप!

नवी मुंबई : देशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील

Pre Marriage Verification : बायोडेटा खरा की खोटा? कर्ज, शिक्षण अन् लपवलेले अफेअर्स... पालकांनी सुरू केली 'हाय-टेक' तपासणी

लपवलेले प्रेमसंबंध, कर्ज, नोकरी, शिक्षण आणि व्यसनांची पडताळणी; ऑनलाईन मॅट्रिमोनियल फसवणूक टाळण्यासाठी कुटुंबे

D Y Patil passes away : शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दुःखद निधन!

कोल्हापूर : देशातील उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारे थोर शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' पुरस्कार