Lock Up 2 : 'लॉक अप २' (Lock Up 2 ) या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री सुनीता आहुजाचा (Sunita Ahuja) प्रवास संपला असून, तिच्या एक्झिटदरम्यान घडलेला एक भावनिक प्रसंग सध्या चर्चेत आहे. शोमधून बाहेर पडताना तिला घेण्यासाठी अभिनेता गोविंदा (Govinda) स्वतः सेटवर पोहोचला. दोघांच्या भेटीचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्याच्या कारणांमुळे सुनीता आहुजाला शोमधून बाहेर पडावे लागले. गेल्या काही दिवसांपासून ती भावनिक तणावात असल्याचे तसेच शो सोडण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचेही सांगितले जात आहे. (Lock Up 2)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या गंभीर आजाराबाबत प्रथमच खुलासा ...
शोमध्ये सूत्रसंचालकांनी तिच्याशी संवाद साधताना ती म्हणाली की, गोविंदाने सुरुवातीपासूनच या शोमध्ये सहभागी होऊ नको, असा सल्ला दिला होता. मात्र आपण तो न ऐकल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे तिने हसत सांगितले. (Reality Show)
यावेळी गोविंदानेही कुटुंबीयांबद्दल बोलताना, "आमच्या मुलांना कधीच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू नये, अशीच माझी इच्छा आहे," असे मत व्यक्त केले. त्यानंतर दोघांमध्ये हलक्याफुलक्या वातावरणात विनोदी संवादही रंगला, ज्यामुळे सेटवरील वातावरण प्रसन्न झाले.
Pavitra Rishta : पवित्र रिश्ता मालिका आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. मालिकेची कथा, पटकथा , अभिनय त्यासोबतच गाणे सर्व काही चाहत्यांच्या मनावर आजही राज करत आहे. ...
दरम्यान, सुनीता आहुजाच्या शोमधून बाहेर पडण्यामागे आरोग्याची कारणे असल्याचे सांगितले जात असले, तरी याबाबत शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत सविस्तर भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र, गोविंदा आणि सुनीता यांच्या भेटीचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.





