मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अर्थात STEM क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी त्यांना इस्रो (ISRO), सिंगापूर किंवा जपानच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवावे, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी केली आहे. (BMC Students ISRO Visit)
इयत्ता आठवी-नववीतील ५० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड :
महापालिकेने इयत्ता आठवी आणि नववीमधील प्रत्येकी ५० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करावी, अशी सूचना अमित साटम यांनी केली आहे. यातील विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे इस्रो आणि सिंगापूर किंवा जपान येथे अभ्यास दौरे आयोजित करावेत, असे त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगत प्रयोग, संशोधन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळण्यास मदत होईल. (BMC Students ISRO Visit)
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा ...
AI आणि रोबोटिक्स लॅबचा संदर्भ :
जुहू येथे AI आणि रोबोटिक्स प्रयोगशाळेने सुसज्ज असलेल्या महापालिकेच्या पहिल्या शाळेच्या उद्घाटनाच्या नियोजनाचा संदर्भही अमित साटम यांनी पत्रात दिला आहे. महापालिका शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत असताना विद्यार्थ्यांना त्यापुढील प्रत्यक्ष अनुभव देणेही आवश्यक आहे. त्यामुळे STEM क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी विशेष उपक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. (BMC Students ISRO Visit)
- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तिच्या मालकीच्या ...
'Teach Mumbai' निधीचा वापर करण्याची सूचना :
महापालिकेने ‘Teach Mumbai’ या शीर्षकाखाली अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. प्रस्तावित अभ्यास दौऱ्यांसाठी या निधीचा वापर करता येऊ शकतो, असे अमित साटम यांनी महापौर आणि आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा या मागणीमधून व्यक्त करण्यात आली आहे. (BMC Students ISRO Visit)





