मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीत क्षेत्रातील गायक पलाश मुच्छल(Palash Muchhal) यांच्या प्रेम संबंधाची चर्चा संपूर्ण देशात पसरली होती. या दोघांचं लग्न देखील ठरलं होत मात्र गायक पलाश मुच्छल याने आपली फसवणूक केल्याचं समजल्यानंतर स्मृती मंधानाने हा विवाह मोडला. या घटनेला जवळपास सहा ते सात महिने उलटून गेल्या नंतर आता या संदर्भात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या गंभीर आजाराबाबत प्रथमच खुलासा ...
क्रिकेटर स्मृती मंधानाची फसवणूक केल्याच्या आरोपामुळेचर्चेत आलेला तिचा एक्स बॉयफ्रेंड गायक पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत सापडला आहे. पलाश हा स्मृतीला भेटण्यासाठी आणि चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने सांगलीत आला होता. तेव्हा त्याची ओळख स्मृती मंधानाचा बालमित्र आणि सांगलीतील चित्रपट निर्माता विज्ञान मानेशी यांच्याशी झाली. पलाशने एका चित्रपटाच्या गुंतवणुकीसाठी माने यांच्याकडून तब्बल 25 लाख रुपये घेतले होते. परंतु पैसे परत न केल्यामुळे त्यांनी जेव्हा पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी माने यांना जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप माने यांनी केला.
जोहान्सबर्ग : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये दमदार कामगिरी करून चर्चेत आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा युवा फुटबॉलपटू जेडन अॅडम्स याचे अवघ्या २५ व्या वर्षी निधन ...
या प्रकरणात माने यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि जिवेमारण्याची धमकी दिल्यामुले तक्रार दाखल केली. सांगली शहर पोलिसांनी या प्रकरणात पलाश मुच्छलवर फसवणूक आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.
अटकेच्या भीतीने पलाशने अटकपूर्व जामिनासाठी सांगलीतील जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्याला अंतरिम जामीन मिळाला होता. अंतिम सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी पलाशचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.





