Saturday, July 11, 2026

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या २ तरुणांची १० तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात ११२ तरुणांची झाडाझडती

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या २ तरुणांची १० तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात ११२ तरुणांची झाडाझडती

कोल्हापूर : पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने यांच्या कथित सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यभर मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी विविध शहरांमध्ये छापेमारी करत ११२ तरुणांची चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra ATS Raids)

एटीएसने संशयितांच्या सोशल मीडिया व्यवहारांची आणि त्यांच्या संपर्कांची तपासणी सुरू केली असून, ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले तरुण मुंबई, ठाणे, मीरा रोड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अहिल्यानगर, परभणी आणि इतर जिल्ह्यांतील असल्याचे समजते. (Maharashtra ATS Raids)

कोल्हापुरातील दोघांची १० तास चौकशी :

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुण या कथित नेटवर्कशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर एटीएसचे पथक तत्काळ कोल्हापुरात दाखल झाले. या दोघांची तब्बल १० तासांहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, तपासाच्या दृष्टीने एटीएसने या कारवाईबाबत अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही. (Maharashtra ATS Raids)

पूर्वीही कोल्हापूर राहिले आहे चर्चेत :

यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्याचे नाव अशाच प्रकारच्या तपासात समोर आले होते. २०२२ मध्ये दहशतवादी संघटनांशी कथित संपर्काच्या संशयावरून हुपरी येथील काही तरुणांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर २०२३ मध्ये राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने हातकणंगले तालुक्यात छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी सोशल मीडिया नेटवर्कशी कथित संपर्काच्या तपासामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचे नाव चर्चेत आले आहे. (Maharashtra ATS Raids)

तपास सुरूच :

या प्रकरणात सोशल मीडिया व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या संपर्कांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, चौकशीनंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, एटीएसकडून राज्यभरातील तपास अधिक तीव्र करण्यात आला असून संशयास्पद ऑनलाइन नेटवर्कवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. (Maharashtra ATS Raids)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >