Saturday, July 11, 2026

Gutkha seized in Jalgaon : गुटखा तस्करांना मोठा दणका! जळगाव जामोदमध्ये २२ लाखांचा मुद्देमाल जप्त; चालक फरार

Gutkha seized in Jalgaon : गुटखा तस्करांना मोठा दणका! जळगाव जामोदमध्ये २२ लाखांचा मुद्देमाल जप्त; चालक फरार

जळगाव जामोद : प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेश–महाराष्ट्र सीमेवरील निमखेडी वन विभाग तपासणी नाक्यावर धडक कारवाई करत एफडीएच्या पथकाने तब्बल १७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत वाहनासह एकूण २२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Gutkha seized in Jalgaon)

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र–मध्य प्रदेश सीमेवरील निमखेडी तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली होती. (Gutkha seized in Jalgaon)

यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या टाटा इंट्रा गोल्ड मालवाहू वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील सुगंधी गुटखा आणि पानमसाल्याचा साठा आढळून आला. एफडीएच्या पथकाची कारवाई सुरू होताच वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. (Gutkha seized in Jalgaon)

नेमका किती मुद्देमाल जप्त?

या कारवाईत एफडीए पथकाने

१० लाख ३९ हजार ५०० रुपये किमतीची ११ हजार ५५० पानमसाल्याची पाकिटे ६ लाख ९३ हजार रुपये किमतीची ११ हजार ५०० सुगंधी गुटख्याची पाकिटे ५ लाख रुपये किमतीचे टाटा इंट्रा गोल्ड वाहन १ हजार रुपये किमतीचा मोबाईल

असा एकूण २२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Gutkha seized in Jalgaon)

फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल :

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Gutkha seized in Jalgaon)

दरम्यान, फरार चालकाचा शोध सुरू असून गुटखा तस्करीच्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करत आहेत. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी सीमावर्ती भागात तपासणी अधिक कडक करण्यात आली असून, अशा प्रकारच्या तस्करीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Gutkha seized in Jalgaon)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >