Thursday, August 20, 2026

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये पावसाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळणार आहेत. विशेषतः कोकण आणि गोवा पट्ट्यात पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

२१ ऑगस्टचा हवामान अंदाज

कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस / वादळी पावसाची दाट शक्यता आहे, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस / वादळी पावसाची दाट शक्यता आहे.

२१ ऑगस्ट रोजी मुंबईतील हवामान कसे असणार?

मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून हलक्या पावसासह आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ अंश सेल्सिअस आणि २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याचा एकंदर अंदाज...

२१ ऑगस्टचा विभागवार हवामान अंदाज

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

२२ ऑगस्टचा विभागवार हवामान अंदाज

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

२३ ऑगस्टचा विभागवार हवामान अंदाज

कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ -बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा

संबंधित बातम्या आणखी वाचा >