Donald Trump : हजार क्षेपणास्त्रे तयार;इराणला ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला आहे. इराणने आपल्या हत्येचा प्रयत्न केल्यास किंवा तशी कोणतीही कारवाई केल्यास अमेरिकेचे लष्कर इराणचा संपूर्ण विनाश करण्यास तयार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. यानंतर इराणनेही अमेरिकेवर सामंजस्य कराराचे (एमओयू) उल्लंघन केल्याचा आरोप करत ठाम भूमिका घेतली आहे.शुक्रवारी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये, "इराणने अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न केल्यास किंवा तशी धमकी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यास इराणकडे लक्ष्य साधून एक हजार क्षेपणास्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यानंतर आणखी हजारो क्षेपणास्त्रे तातडीने डागली जाऊ शकतात," असा दावा केला. तसेच, अमेरिकन लष्कराला इराणमधील सर्व क्षेत्रे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.ट्रम्प यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावात पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः अणुकार्यक्रम आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधूनमधून तीव्र होत आला आहे.(America-Iran)



दरम्यान अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्याने पश्चिम आशियातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक इशाऱ्यांमुळे आणि इराणच्या ठाम प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशांतील मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांमुळे संघर्ष टाळण्याचा मार्ग खुला राहील का, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.(Donald Trump)



अमेरिकेवर करारभंगाचा आरोप


ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री सैयद अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर पलटवार केला. त्यांनी अमेरिकेच्या अर्थ विभागाकडून सामंजस्य करारातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. "इराणने आतापर्यंत आपले वचन पाळले आहे. मात्र अमेरिकेकडून सातत्याने करारभंग आणि चुकीची पावले उचलली जात आहेत. कोणत्याही कराराचा पाया हा परस्पर पालनावरच आधारित असतो," असे अराघची यांनी स्पष्ट केले.



'इराण कधीही शरण जाणार नाही'


इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घालिबाफ यांनीही अमेरिकेच्या दबावाला झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. तेहरान कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसमोर शरणागती पत्करणार नाही आणि कराराचे उल्लंघन झाल्यास स्वतःचे संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला. इराणची सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.



सीमेवर कडक नजर


दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी देशातील संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सतर्क असल्याचे सांगितले. इराणच्या किनारपट्ट्या, बेटे, सीमावर्ती भाग आणि अन्य संवेदनशील ठिकाणी लष्करी दल शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.



पडद्यामागे सुरूच संवाद


तणावपूर्ण वक्तव्ये आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक संवाद मात्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, दोन्ही देशांमधील चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरत आहेत. मात्र कोणत्याही संभाव्य करारासाठी इराणने अणुकार्यक्रमावर निर्बंध स्वीकारणे आणि संबंधित अणुसाहित्याच्या हस्तांतरणास सहमती देणे आवश्यक असल्याची अमेरिकेची भूमिका कायम आहे.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के