Ashish Shelar : लोककलांच्या धोरणाच्या बळकटीकरणासाठी समिती स्थापन करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार


राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार झाले आहे, त्यामध्ये लोककलांचा विचार करण्यात आला आहेच. त्याचा अभ्यास करुन अजूनही काही बाबिंचा समावेश करणे, लोककलांना अधिकचे प्रोत्साहन देणे, जतन संवर्धनाला बळकटीकरण व्हावे, यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी आज येथे केले.



पद्मश्री रघुवीर खेडकर(Raghuvir Khedekar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलावंतानी पुण्यातील मोती बाग येथे मंत्री शेलार यांची भेट घेतली. या संवाद कार्यक्रमात रघुवीर खेडकर यांनी यावेळी शासनाकडे लोककलावंताच्या मागण्या मांडल्या. यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश अवलगावकर,समरसता गतीविधी अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. रमेश पांडव आणि कलावंत उपस्थित होते.



यावेळी कलावंतांशी संवाद साधताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, आज डिजिटलचे युग असून जगभरातील दर्शकांना व पुढच्या पिढीला ज्ञात व्हाव्यात म्हणून लोककलांचे डिजिटल संग्रहालय, दस्तावेजीकरण, जतन आणि पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा उपक्रम आपण तातडीने सुरू करू. शासनाच्या विविध जनजागृती आणि प्रचार-प्रसार योजनांमध्ये स्थानिक लोककलावंतांना प्राधान्य दिले पाहिजे. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास किंवा शासनाच्या विविध योजनांचा प्रचार असो, या सर्व ठिकाणी लोककलावंतांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आवश्यक शासन निर्णय तातडीने काढण्याची कार्यवाही आपण करू, असेही त्यांनी आश्वस्त केले. शासनाच्या दृष्टीने लोककलावंत आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य अधिक महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शासन सकारात्मक भूमिका घेऊन पुढेही ठोस निर्णय घेत राहील, याची मी आपणास ग्वाही देतो. दरम्यान, यावेळी लोक कलावंताच्या अनुदानात दुप्पटीने वाढ केल्याबद्दल उपस्थितीत कलाकारांनी शासनाचे आभार मानले.

Comments
Add Comment

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने