Thursday, July 9, 2026

Suchitra Bandekar : मी नाशिकची नाहीच… लोकांचा मोठा गैरसमज; अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले त्यांचे खरे मूळ गाव

Suchitra Bandekar : मी नाशिकची नाहीच… लोकांचा मोठा गैरसमज; अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले त्यांचे खरे मूळ गाव

Suchitra Bandekar : मराठी आणि हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या मूळ गावाबाबत अनेक वर्षांपासून असलेला गैरसमज दूर केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, अनेकांना त्या नाशिकच्या (Nashik) असल्याचे वाटते, मात्र प्रत्यक्षात त्यांचा जन्म आणि संपूर्ण बालपण मुंबईतच गेले आहे.

माझा जन्म मुंबईत झाला, मी मुंबईचीच

‘सोनचाफा प्रॉडक्शन’ला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) म्हणाल्या, "लोकांना उगाचच वाटतं की मी नाशिकची आहे. पण माझे नाशिकमध्ये फक्त काही परिचित आहेत. माझा जन्म मुंबईत झाला, मी मुंबईतच वाढले आणि मी मुंबईचीच आहे. त्यामुळे मी नाशिक किंवा पुण्याची आहे, असा गैरसमज लोकांनी करून घेऊ नये."

याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींनाही उजाळा दिला. अवघ्या १८–१९ व्या वर्षी लग्न, आर्थिक चढ-उतार, तसेच 'सोहम प्रॉडक्शन हाऊस' उभारण्याचा प्रवास याबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याचे सांगितले. बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिक्षण घेत असताना तिसरी-चौथीपासूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.

अनेक मालिकांमधून उमटवला अभिनयाचा ठसा

'आभास हा', 'वहिनीसाहेब', 'अवंतिका', 'हम पाँच', 'घर की लक्ष्मी बेटियाँ' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दरम्यान, आगामी काळात त्या कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, आदेश बांदेकर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. ते होम मिनिस्टर या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >