Thursday, October 15, 2026

WI vs SL : वेस्ट  इंडिजचा ऐतिहासिक विजय मात्र, आयसीसीने ठोठावले दंड; नेमकं कारण काय ? 

बार्बुडा: वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकून इतिहास रचला आहे. रॉस्टन चेसच्या नेतृत्वाखाली, वेस्ट इंडिजने २३ वर्षांत प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकून एक विक्रम  केला आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वेस्ट इंडिज संघावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.(WI vs SL)

नेमकं प्रकरण काय ? 

आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वेस्टइंडीजच्या खेळाडूंवर मॅच फीच्या १० टक्के दंड ठोकण्यात आला आहे. ही मॅच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतर्गत खेळवली गेल्याने वेस्टइंडीजचे २ महत्त्वाचे गुण देखील कापण्यात आले आहेत.
आयसीसीच्या नियमानुसार,स्लो ओव्हर रेटच्या प्रकरणात प्रत्येक कमी ओव्हर मागे खेळाडूंच्या मॅच फीमधून 5 टक्के दंड केला जातो, जो जास्तीत जास्त 50 टक्क्यांपर्यंत असू शकतो. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांनुसार,प्रत्येक कमी ओव्हर मागे टीमचा 1 गुण कापला जातो.वेस्ट इंडीजचा कर्णधार रोस्टन चेस याने गुन्हा मान्य केला आहे.आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या खेळण्याच्या अटींमधील कलम १६.११.२ नुसार, निर्धारित गतीपेक्षा कमी टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी संघाचे एक WTC गुण वजा केले जातात.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >