Sunday, July 5, 2026

एकाच कुटुंबातील पाच जण गायब ! पळाले की घातपात ? नेमकं घडलं काय ?

एकाच कुटुंबातील पाच जण गायब ! पळाले की घातपात ? नेमकं घडलं काय ?

Nagpur : नागपूरच्या धानतोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्य २४ जूनपासून बेपत्ता झाले आहेत. मागील ११ दिवसांपासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धानतोली पोलीस ठाण्यात पाच जण हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ते शेवटचे पुण्यात राहत असल्याचे समजते.

नेमकं घडलं काय ?

श्यामसुंदर (७१ वर्षीय) आणि त्यांचे भाऊ सुरेश पारसवानी यांचे कुटुंब धानतोली परिसरात एकत्र राहत होते. २४ तारखेला सुरेश पारसवानी यांच्या कुटुंबातील पाच सदस्य कोणालाही न कळवता अचानक घरातून निघून गेले. नातेवाईकांनी या पाच जणांचा सर्वत्र शोध घेतला, ओळखीच्या लोकांची चौकशी केली, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.(Lawrence Bishnoi Gang)

बेपत्ता झालेल्या सदस्यांची नावे : हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२ वर्षे), इशिता परसवानी (वय ४० वर्षे), खुशी परसवानी (वय २१ वर्षे), कृष्णा परसवानी (वय १२ वर्षे)

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, बेपत्ता असलेल्या सदस्यांपैकी एकावर मोठ्या प्रमणावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाच्या बोजाला कंटाळून या कुटुंबाने घर सोडले की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरची तांत्रिक तपासणी(Technical Analysis) केली असता, सर्वांचे शेवटचे लोकेशन पुणे येथील आहे. हे सर्वजण स्वतःहून पुण्यात गेले की त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे? याचा तपास सध्या धानतोली पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >