रायगड : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना (New Ropeway Project) शासनाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होणार असून रायगडच्या पर्यटन विकासाला नवी गती मिळणार आहे. (New Ropeway Project)
शासनाच्या 'पर्वतमाला' योजनेअंतर्गत विकसित होणाऱ्या या प्रकल्पांमध्ये घारापुरी (एलिफंटा) लेणी, अलिबाग समुद्रकिनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, रायगड किल्ल्याचा पायथा ते रायगड किल्ला आणि अलिबागमार्गे श्री क्षेत्र कनकेश्वर डोंगर या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. या रोप-वेच्या माध्यमातून दुर्गम आणि डोंगराळ भागांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. (New Ropeway Project)
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (४ जुलै) मँचेस्टरमध्ये (Manchester) खेळला जाईल. दोन्ही संघांमधील पहिला ...
विशेष म्हणजे रायगड किल्ला, माथेरान आणि कनकेश्वरसारख्या ठिकाणी चढाई करताना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वेळेची बचत होण्यासोबतच पर्यटनाचा अनुभव अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पांचा फायदा केवळ पर्यटकांनाच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही होणार आहे. रोप-वे प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता असून हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा, स्थानिक मार्गदर्शक, हस्तकला विक्रेते आणि इतर लघुउद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रायगडमधील पर्यटन व्यवसायाला नवी उभारी मिळेल. (New Ropeway Project)
सध्या या प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पर्यावरणीय मंजुरी, तांत्रिक तपासणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. (New Ropeway Project)
मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील अजित ग्लास गार्डन गेटसमोर भरधाव टँकरने ...
राज्यातील पर्यटन नकाशावर रायगडला अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी हे रोप-वे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही यामुळे मोठी चालना मिळणार असल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. (New Ropeway Project)






