कराड (सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत धरणात तब्बल २.१६ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने जलसंपदा विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पावसाचा हा वेग कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत धरणातून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात (Private ...
शनिवार (४ जुलै) रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोयना धरणातील एकूण पाणीसाठा १८.१९ टीएमसी (१७.२८ टक्के) इतका झाला आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १३.०७ टीएमसी (१३.०५ टक्के) इतका आहे. धरणाची पाणीपातळी २०५१.०१ फूट (६२५.१७० मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रिंग रोड (Ring Road) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनामुळे (Land Acquisition) बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ...
सध्या धरणात २५,००८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. मात्र, अद्याप वीजनिर्मिती केंद्रातून किंवा नदीपात्रात कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत कोयना येथे १८९ मिमी, नवजा येथे २१० मिमी आणि महाबळेश्वर येथे २३३ मिमी पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आतापर्यंत कोयना येथे ६२२ मिमी, नवजा येथे ८७३ मिमी आणि महाबळेश्वर येथे ८७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अर्लिंग्टन (टेक्सास) : फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान डॅलसमधील संघाच्या हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन यांनी हे प्रकरण ...
पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज असल्याने धरणातील पाणीसाठा आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच धरणातील पाणीसाठा आणि हवामानाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गाबाबत निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.






