मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील अजित ग्लास गार्डन गेटसमोर भरधाव टँकरने (Tanker) एका डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हर्ष नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना रात्री सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास घडली. हर्ष डिलिव्हरीचे काम करत असताना भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्याला चिरडले. अपघात इतका भीषण होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
रत्नागिरी : रत्नागिरीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) वरील आंजनारी घाटात (Anjanari Ghat) शुक्रवारी (३ जुलै) सकाळी भीषण अपघात (Accident) घडला. ब्रेक (Brake) ...
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी टँकर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला आहे. अपघात झाल्यानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत टँकरचा पाठलाग केला आणि चालकाला पकडले. प्रत्यक्षदर्शींनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून चालकाची चौकशी केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि चालकाने मद्यपान केले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.






