Saturday, July 4, 2026

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यावर पावसाचे संकट! पावसामुळे सामना रद्द होणार?

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यावर पावसाचे संकट! पावसामुळे सामना रद्द होणार?

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (४ जुलै) मँचेस्टरमध्ये (Manchester) खेळला जाईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हा आगामी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. AccuWeather च्या एका अहवालानुसार, दुसरा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.मालिकेचा पहिल्या सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सात गडी बाद १८९ धावा केल्या. अभिषेक आणि श्रेयस अय्यरच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताला १८५ धावांचा टप्पा गाठता आला होता. (IND VS ENG )

दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार ?

AccuWeatehr च्या अंदाजानुसार, दुसऱ्या सामन्यादरम्यान पावसामुळे अडचण येऊ शकते. मँचेस्टरमध्ये पहाटेच्या वेळी पाऊस पडण्याची ५७ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. हलका वारा आणि हलक्या पावसाचीही शक्यता असून, त्यामुळे नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. सायंकाळी ४ ते रात्री ८ च्या दरम्यान, सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची ५१ टक्के शक्यता आहे. परिणामी, सामना थांबवावा लागू शकतो किंवा षटकांची संख्या कमी करावी लागू शकते. तथापि, मँचेस्टरचे मैदान पहिल्या सामन्याच्या ठिकाणापेक्षा अधिक सुसज्ज आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे, पाऊस थांबल्यानंतर थोड्याच वेळात मैदान खेळासाठी तयार केले जाऊ शकते. त्यामुळे, सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे, ही चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >